HW News Marathi
Covid-19

बारामतीत आज कोरोनाचा दुसरा बळी

पुणे | बारामती तालुक्यात माळेगाव येथे आज (२५ एप्रिल) एका ६० वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. बारामतीमध्ये कोरोनामुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे. त्यामुळे बारामतीकरांची चिंता आता वाढली आहे. हा रुग्ण किडनीच्या विकाराने त्रस्त होता. त्यामुळे डायलिसिससाठी हा रुग्ण पुण्यातील खाजगी रुग्णालयामध्ये होता. मात्र, तिथेच त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले. त्यामुळे बारामतीतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८ वर पोहोचली होती. या रुग्णाचा आज पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, बारामती यापूर्वी एका कोरोनाबाधित भाजीविक्रेत्याचा मृत्यू झाला होता.

डायलिसिस सुरु असताना या रुग्णांत कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नव्हती. मात्र, शुक्रवारी (२५ एप्रिल) त्याची प्रकृती खालावल्याने त्याचे थ्रोट सॅम्पल्स घेण्यात आहे. या तपासणीच्या अहवालात हा व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. त्यानंतर आजच उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला. यापूर्वी बारामतीत एका कोरोनाबाधित भाजी विक्रेत्याचा मृत्यू झाला होता. बारामतीत आतापर्यंत एकूण ५ जण कोरोनामुक्त झाले असून दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यान, पोलिसांकडून माळेगावमध्ये संबंधित परिसर सील करण्यात आला आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकट्या मुंबईत आज तब्बल ५ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

Nisarg cyclone| शरद पवारांचा कोकण दौरा सुरू

News Desk

शिवसेना नगरसेविका काळाच्या पडद्याआड, रणरागिणी सत्यभामा गाडेकर यांचं कोरोनाने निधन

News Desk