HW News Marathi
Covid-19

राज्यात ३० हजारांच्या आत आढळले नवे रूग्ण तर बरे झालेल्या रूग्णांची संख्या ४० हजारांवर

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ५० हजारांच्या पुढे नवे रुग्ण आढळत आहेत. राज्यात आता दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही सातत्याने अधिक आढळून येत लागली आहे. आज दिवसभरात राज्यात ४८ हजार २११ रूग्ण कोरोनातून बरे झाले तर, २६ हजार २११ नवीन करोनाबाधित आढळून आले. याशिवाय ५१६ रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे.

आजपर्यंत राज्यात ४८,७४,५८२ रूग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहे. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) आता ९०.१९ टक्के झाले आहे. याचबरोबर आजपर्यंत राज्यात ८२ हजार ४८६ रूग्णांचा मृत्यू झाला असून, राज्याचा मृत्यू दर आता १.५३ टक्के आहे.

 

पुण्यात काय स्थिती?

पुण्यात ६८४ नवे रूग्ण आढळले आहेत. तर, २७९० रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत काय स्थिती?

मुंबईत गेल्या २४ तासांत १२४० नवे रूग्ण आढळले आहेत. तर २५८७ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत आणि ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दुसऱ्या लाटेत मुंबई पुण्यातील रूग्ण संख्या कमी होताना दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

एका कोरोना रुग्णामुळे बीड शहरासह १२ गावांमध्ये पुढील आठ दिवस संचारबंदी

News Desk

राज्यात काल ११ हजार ८७७ कोरोना रुग्णांची नोंद; मुंबईत ८ हजार रुग्ण

Aprna

भारत बायोटेकच्या Covaxinला २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीस परवानगी

News Desk