HW News Marathi
Covid-19

राज्यात आज पुन्हा ३० हजारांच्या आत आढळले रूग्ण तर बरे डिस्चार्ज रूग्ण संख्या वाढली

मुंबई | राज्यात बाधित रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढून नव्या कोरोनाबाधितांचा आकडा खाली येऊ लागला आहे. त्यामुळे राज्यासाठी ही एक दिलासादायक बाब ठरली आहे. आज आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात दिवसभरात २८ हजार ४३८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मात्र, त्याचवेळी ५२ हजार ८९८ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील अशा बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा आता ४९ लाख २७ हजार ४८० इतका झाला असून राज्याचा रिकव्हरी रेट ९०.६९ टक्क्यांवर गेला आहेेेे.

 

दरम्यान, एकीकडे रिकव्हरी रेट हळूहळू वाढत असताना राज्यातला मृत्यूदर मात्र कमी होत नाहीये. तसेच, मृतांचा आकडा देखील अजूनही मोठाच आहे. आरोग्यविभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात मंगळवारी ६७९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे, राज्यातील एकूण मृतांचा आकडा ८३ हजार ७७७ इतका झाला आहे. तसेच मृत्यूदर देखील १.५४ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

पुण्यात एकाच दिवसात १ हजार ०२१ नवे कोरोनाबाधित!

दुसरीकडे पुण्यात २४ तासांत १ हजार ०२१ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे एकूण करोनाबाधितांची संख्या ४ लाख ६१ हजार ००८ इतकी झाली आहे. त्याचवेळी आज दिवसभरात पुण्यात ४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा देखील वाढून ७ हजार ७९५ इतका झाला आहे. २४ तासात पुण्यात २ हजार ८९२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आजपर्यंत अशा डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ४ लाख ३६ हजार ६९० इतकी झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात कोरोना रुग्णांचा आकडा १० लाखांच्या पार !

News Desk

मद्यप्रेमींनी दुकानांसमोर सोशल डिस्टन्स पाळत लावली रांग

News Desk

ग्रंथालय सुरू करण्यासाठी राज्य सरकारचा आदेश; मेट्रो देखील १५ऑक्टोबरपासून सुरु होणार  

News Desk