HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात कोरोनाचा सातवा बळी,  कोरोनाग्रस्त ४० वर्षीय महिलेचा मुंबईत मृत्यू

मुंबई | कोरोनामूळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत आणखी एक भर पडली आहे. मुंबईत कोरोनाची लागण झालेल्या ४० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्य झाला आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, चाचणी नंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. परंतू, दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला असून महाराष्ट्रात कोरोनामूळे मृत्यू झालेल्यांचा आकडा हा ७ झाला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितंची संख्या १९३ वर पोहोचला आहे.

सांगलीत कोरोनाने हाहाकार माजवला आहे. सद्यस्थितीला सांगलीत एकूण २५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर, या रुग्णांच्या सानिध्यात आलेले एकूण ३३३ नागरिकांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा सांगतील होत असलेला हा फैलाव लक्षात घेता इस्लामपूर शहर आजपासून (२९ मार्च) ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राज्याच्या राजकारणात पाठीत खंजीर खुपसणारा दुसरा चेहरा’, चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार!!

News Desk

ST बाबत महत्त्वाची बैठक; शरद पवार, अजित पवार आणि अनिल परबांमध्ये चर्चा सुरू

News Desk

पुनम महाजन आजकाल कुठे आहेत; संजय राऊतांचा सवाल

Aprna