HW News Marathi
Covid-19

केडीएमसीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ३०० पार, तर ६७ वर्षीय वृध्दांचा मृत्यू

मुंबई | कल्याण-डोंबिवली महापालिकाच्या परिसरात आज २५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता एकूण रुग्णांची संख्या ३०५ वर गेली आहे. यापैकी डोंबिवलीत ६७ वर्षीय एका वयोवृद्धचा कोरोनामुळे आज (९ मे) मृत्यू झाला आहे. तर कल्याण-डोंबिवलीमध्येय आतापर्यंत चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या २५ नव्या रुग्णांपैकी १२ रुग्ण हे अत्यावश्यक सेवेतील आहे.

कल्याण-डोंबिवली हे आता नवे कोरोना हॉटस्पॉट बनलेले दिसून येत आहे. कल्याण-डोंबिवलीतील हद्दीतील बहुतांशी रहिवासी नोकरीनिमित्त मुंबईत रुग्णालये, मुंबई पालिका, पोलीस, बँका, दूरचित्रवाणी वाहिन्या, मंत्रालय, खासगी अत्यावश्यक सेवेतील कंपन्यांमध्ये कामाला जातात. केडीएमसी शहरांत गेल्या दीड महिन्यात विदेशातून आलेले स्थानिक रहिवासी, लग्न-हळदी समारंभात सहभागी झालेल्या अनेकांना करोनाची लागण झाली होती.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १९ हजार ६३ झाली आहे. राज्यात काल (८ मे) १६९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३४७० रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली. राज्यात आतापर्यंत ७३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोविड-१९ वैद्यकीय सेवेसाठी चार हजार डॉक्टर्स तातडीने उपलब्ध करून देणार | वैद्यकीय शिक्षण मंत्री

News Desk

सेलिब्रिटींना, राजकारण्यांना कोरोनावरील औषधे कोण पुरवते!

News Desk

ऑक्सिजन टँकर रस्ता चुकला आणि ७ कोरोना रुग्णांचा झाला मृत्यू

News Desk