मुंबई। राज्यात आज कोरोनाबाधित ५२२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ८५९० झाली आहे. आज ९४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२८२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ६९३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (२७ एप्रिल) दिली.
राज्यात आज 522 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 8590 अशी झाली आहे. यापैकी 1282 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 27, 2020
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख २१ हजार ५६२ नमुन्यांपैकी १ लाख १२ हजार ५२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर ८५९० जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ४५ हजार ६७७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ९ हजार ३९९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात २७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३६९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे १५, अमरावती शहरातील ६, पुणे शहरातील ४ तर जळगाव येथील १ आणि औरंगाबाद शहरातील १ आहे. अमरावती शहरात झालेले मृत्यू हे दिनांक २० ते २५ एप्रिल २०२० या कालावधीतील आहेत.
आज झालेल्या मृत्यूंपैकी १५ पुरुष तर १२ महिला आहेत. आज झालेल्या २७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १३ रुग्ण आहेत तर ८ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ६ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या २७ रुग्णांपैकी २२ जणांमध्ये (८१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यातील एकाला एचआयव्ही आणि आणखी एक रुग्णाला कर्करोग होता.
राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा संख्या
- मुंबई : ५७७६ (२१९)
- ठाणे: ४० (२)
- ठाणे मनपा: २९५ (४)
- नवी मुंबई मनपा: १३५ (३)
- कल्याण डोंबिवली मनपा: १४५ (३)
- उल्हासनगर मनपा: २
- भिवंडी निजामपूर मनपा: १४
- मीरा भाईंदर मनपा: १२१ (२)
- पालघर: २५ (१)
- वसई विरार मनपा: १२१ (३)
- रायगड: १८
- पनवेल मनपा: ४३ (१)
- ठाणे मंडळ एकूण: ६७३५ (२३८)
- नाशिक: ४
- नाशिक मनपा: १९
- मालेगाव मनपा: १२३ (१२)
- अहमदनगर: २६ (२)
- अहमदनगर मनपा: १६
- धुळे: ४८(२)
- धुळे मनपा: १७ (१)
- जळगाव: १८ (४)
- जळगाव मनपा: २ (१)
- नंदूरबार: ११ (१)
- नाशिक मंडळ एकूण: २४४ (२३)
- पुणे:५८ (३)
- पुणे मनपा: ९६९ (७४)
- पिंपरी चिंचवड मनपा: ७२ (३)
- सोलापूर: ६
- सोलापूर मनपा: ५९ (५)
- सातारा: २९ (२)
- पुणे मंडळ एकूण: ११९३ (८७)
- कोल्हापूर: ७
- कोल्हापूर मनपा: ४
- सांगली: २६
- सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)
- सिंधुदुर्ग: १
- रत्नागिरी: ८ (१)
- कोल्हापूर मंडळ एकूण: ४७ (२)
- औरंगाबाद:१
- औरंगाबाद मनपा: ५१ (६)
- जालना: २
- हिंगोली: ८
- परभणी मनपा: १
- औरंगाबाद मंडळ एकूण: ६३ (६)
- लातूर: १० (१)
- उस्मानाबाद: ३
- बीड: १
- नांदेड मनपा: ३
- लातूर मंडळ एकूण: १७ (१)
- अकोला: ११ (१)
- अकोला मनपा: १८
- अमरावती: १
- अमरावती मनपा: २१ (७)
- यवतमाळ: ६२
- बुलढाणा: २१ (१)
- वाशिम: १
- अकोला मंडळ एकूण: १३५ (९)
- नागपूर: ४
- नागपूर मनपा: १२३ (१)
- भंडारा: १
- गोंदिया: १
- चंद्रपूर मनपा: २
- नागपूर मंडळ एकूण: १३१ (१)
- इतर राज्ये: २५ (२)
एकूण: ८५९० (३६९)
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.