HW News Marathi
महाराष्ट्र

पिंपरीतील कोरोनाग्रस्त होत आहेत बरे, ५ जणांना आज मिळाला डिस्चार्ज

पिंपरी| एकीकडे महाराष्ट्राचा कोरोनाबाधितांचा आकडा १९३ वर पोहोचला असला तरी दुसरीकडे कोरोनावर मात करुन बरी होऊन लोकं घरी जात आहेत. पुण्यात दुबईहून आलेल्या दाम्पत्याला प्रथम कोरोनाची लागण झाली हे लक्षात आले आणि मग राज्यात कोरोनाचा फैलाव झाला. परंतू जसे हे दाम्पत्य कोरोनावर मात करुन घरी गेले. आता पिंपरीतील आणखी ५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. हे ५ रुग्ण भोसरी रुग्णालयात उपचार घेत होते. डिस्चार्ज देताना संपूर्ण स्टाफने त्यांचे टाळ्या वाजवत त्यांना घरी पाठवले.

पिंपरीत दोन दिवसांआधी ३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. आज (२९ मार्च) ५ तर एकूण ८ जणांनी कोरोनावर मात करत सुखरुप घराकडे गेले आहेत. पिंपरीत १२ जण कोरोनाग्रस्त होते त्यापैकी अजूनही ४ जणांवर उपचार सुरु आहेत. १५ मार्चला ज्या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते त्या रुग्णाचा दसरा कोरोना रिपोर्ट हा निगेटिव्ह आला असून त्या रुग्णाला उद्या (३० मार्च) डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्यामूळे लोकांनी लागण झाली जरी असेल तरी घाबरुन न जाता डॉक्टरांच्या सर्व सूचनांचे पालन करा नक्की या आजारातून आपण मुक्त होऊ शकतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लातूरमध्ये टायपिंगच्या परिक्षेत बोगस परिक्षार्थ्यांची हजेरी

News Desk

आरोग्यमंत्र्यांनी खोलवर माहिती न घेता RTPCR किट्सवर वक्तव्य केले – अमित देशमुख 

News Desk

“मोदी महाराष्ट्रात का आले नाही असा सवाल करता, मग मुख्यमंत्र्यांचा दोनच जिल्ह्यांचा दौरा का?”

News Desk