मुंबई | राज्यात दररोज नवी कोरोना रुग्ण संख्या वाढत चालली आहे. गेल्या २४ तासात ८,१३९ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २२३ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १०,११६ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये ४,३६० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या २ लाख ४६ हजार ६०० इतकी झाली आहे. यापैकी १ लाख ३६ हजार ९८५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती.
राज्यात आज 8139 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 246600 अशी झाली आहे. आज नवीन 4360 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 136985 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 99202 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) July 11, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.