HW News Marathi
Covid-19

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आणखी ३ रुग्ण महाराष्ट्रात आढळले

पुणे | कोरोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालेले आणखी ३ पॉझिटीव्ह रुग्ण महाराष्ट्रात असल्याचं आढळून आले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली. हे तिन्ही प्रवासी रुग्ण पिंपरी – चिंचवडचे असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळं आता पिंपरी- चिंचवड भागात दहशतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.

दरम्यान, आतापर्यंत राज्यात ब्रिटनमधील कोरोना व्हायरच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालेल्यांची रुग्णसंख्या ११वर पोहोचली असतानाच त्यातील २ रुग्णांना रुग्णालयातून रजा देण्यात आली आहे. यामध्ये मुंबई आणि पुण्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार नव्या स्ट्रेनच्या कोरोनाचा संसर्ग झालेले ११ रुग्ण हे असिम्प्टमॅटिक आहेत. अर्थात या रुग्णंमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आलेली नाहीत.

आंतरराष्ट्रीय प्रवास करुन आलेल्या प्रवाशांच्या चाचण्यांना राज्यात वेग….

महाराष्ट्रात आतापर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवास करुन आलेल्या जवळपास ४८५८ प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. युकेमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची दहशत पसरलेली असतानाच सावधगिरी म्हणून राज्यात हे पाऊल उचलण्यात आलं आहे. या प्रवाशांपैकी १२११ जणांना आतापर्यंत त्यांनी अत्यावश्यक अशा संस्तात्मक विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला आहे.

राज्यात कोरोना लसीच्या ड्राय रनची लगबग

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज (८ जानेवारी) महाराष्ट्रातील ३० जिल्हे आणि २५ महापालिका क्षेत्रांमध्ये आज कोरोना लसीकरणाचं ड्राय रन केलं जाणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या माहितीनुसार प्रत्येक जिल्ह्यातील तीन आरोग्य केंद्र आणि मनपातील एका आरोग्य केंद्रावर ड्राय रन केलं जाईल. यापूर्वी २ जानेवारीला पुणे, नंदुरबार, जालन आणि नागपूर जिल्ह्यासह नागपूर मनपा आणि पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये ड्राय रन करण्यात आलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हात जोडतो, दुखणी अंगावर काढू नका ! आरोग्यमंत्र्यांचे कळकळीचे आवाहन

News Desk

भूमिपुत्रांच्या रोजगाराच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

News Desk

मुख्यमंत्री एक नंबर काम करत आहेत – अस्लम शेख

News Desk