HW News Marathi
Covid-19

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा अखेर ४ लाखांच्या खाली!

नवी दिल्ली | देशभरात कोरोनाचा जोर अजूनही कायम असून, रोज ३ ते ४ लाख रुग्णांची भर पडत आहे. रुग्णसंख्येच्या या वाढत्या आकड्यामुळे आरोग्य सुविधा कोलमडताना दिसत असून, वेळेत उपचार न मिळाल्याने, त्याचबरोबर ऑक्सिजन वा इतर सुविधांअभावी रुग्णांचे प्राण जात आहे. देशातील मृत्यूचा वेग अजूनही कायम असून, दररोज साडेतीन ते चार हजारांच्या सरासरीने मृत्यू होत आहे. त्यामुळे एकूण करोना बळींची संख्या अडीच लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.

गेल्या २४ तासांतील आकडेवारी मागील काही दिवसांतील आकडेवारीच्या तुलनेत दिलासा देणारी आहे. देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ६६ हजार १६१ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ लाख ५३ हजार ८१८ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.

तसेच, गेल्या २४ तासांत ३ हजार ७५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या दोन लाख ४६ हजार ११६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे देशात सध्या ३७ लाख ४५ हजार २३७ रुग्ण उपचार घेत आहेत.

 

महाराष्ट्रातील स्थिती काय?

महाराष्ट्राचा रुग्णआलेख घसरणीला लागला असून, रविवारी दैनंदिन रुग्णसंख्या ५० हजारांखाली नोंदविण्यात आली होती. मुंबई, ठाण्यासह अनेक मोठय़ा शहरांत लक्षणीय रुग्णघट होत असल्याने राज्याला दिलासा मिळाला आहे. राज्यात रविवारी करोनाचे ४८,४०१ रुग्ण आढळले, तर ५७२ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात तीन लाख नमुन्यांची चाचणी के ल्यानंतर शनिवारच्या तुलनेत रविवारी रुग्णसंख्या पाच हजारांनी घटली. गेल्या सोमवारी राज्यात ४८,६२१ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर पहिल्यांदाच दैनंदिन ५० हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली.मुंबईमधील करोनावाढीचा सरासरी दर रविवारी ०.४४ टक्क्य़ांपर्यंत घसरला. मुंबईत रविवारी २,४०३ जणांना करोनाची लागण झाली, तर ६८ रुग्णांचा मृत्यू झाला.

२६ राज्यांत लॉकडाउन सदृश्य निर्बंध

देशात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असून, आठवडाभरात पाचव्यांदा दैनंदिन रुग्णसंख्या चार लाखांहून अधिक नोंदवण्यात आली आहे. देशात रविवारी करोनाचे ४,०३,७३८ रुग्ण आढळले, तर ४,०९२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दिल्ली, उत्तर प्रदेश सरकारने निर्बंध आणखी आठवडाभरासाठी वाढविण्याचा निर्णय रविवारी घेतला. रुग्णवाढीमुळे तमिळनाडू, कर्नाटकमध्ये आजपासून (१० मे) लॉकडाउन लागू करण्यात येत असून, देशातील जवळपास २६ राज्यांत लॉकडाउनसदृश निर्बंध लागू आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘बीएमसी’च्या कोरोना वॉरियर्सच्या वारसांना ५० लाखांची मदत

News Desk

कोरोनाची लागण अथवा मृत्यू झाल्यास पत्रकारांना ५० लाखांचे मिळणार विमा कवच !

News Desk

पुण्यात कोरोनाचा पहिला बळी , महाराष्ट्रात ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यु

Arati More