मुंबई | राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आज (२२ मार्च) राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारपरिषद घेऊन, रूग्ण संख्या अशीच वाढत राहिली तर, काही शहरांमध्ये लॉकडाउन सुरू करावं लागेल, असा सूचक इशारा देखील दिला आहे.
दरम्यान, आज दिवसभरात राज्यात २४ हजार ६४५ नवीन करोनाबाधित आढळले असून, ५८ रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.१३ टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण २,१५,२४१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात आज 24645 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 19463 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2234330 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 215241 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.22 % झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 22, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.