HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोना नियमांचं उल्लंघन, भाजप नेत्यासह ३ जणांवर गुन्हा दाखल

पुणे | माजी खासदार व भाजपचे नेते धनंजय महाडीक यांच्या मुलाचा शाही स्वागत-समारंभ सोहळा हडपसरच्या लक्ष्मी लॉन्समध्ये महाराष्ट्राच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यात कोरोना नियमांचं सर्रास उल्लंघन झाल्याचं दिसून आल्यानंतर आता कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडीक यांच्यासह आणखी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१ आणि महाराष्ट्र कोव्हिड-१९ उपाययोजना २०२० कलम ११ तसेच इतर कलमांन्वये धनंजय महाडीक यांच्यासह लक्ष्मी लॉन्सचे मालक विवेक मगर आणि व्यवस्थापक निरूपल केदार यांच्यावर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात रात्री ११ ते सकाळी ६ पर्यत संचारबंदी जाहीर केली आहे. तर पुणे जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालये देखील २८ फेब्रुवारी पर्यत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर धनंजय महाडीक यांच्या मुलाच्या स्वागत समारंभात उडालेला सोशल डिस्ट्न्सिंगचा फज्जा हा कळीचा मुद्दा बनला आहे.

या सोहळ्यास महाराष्ट्रातील जवळपास सर्वच दिग्गज राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. कोेरोनाचा वाढता संसर्ग आणि धोका लक्षात घेता ठराविक लोकांपेक्षा अधिक लोकांना जाणीवपूर्वक लग्न किंवा इतर सोहळ्यासाठी एकत्र केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हडपसरच्या लक्ष्मी लाँन्समधील या सोहळ्याला शरद पवार, संजय राऊत, देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, रामदास आठवले, चंद्रकांत पाटील, वंदना पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी हजेरी लावली होती, त्यामुळे हजारोंच्या संख्येने येथे लोक उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती पूर्ण बिघडली! – चंद्रकांत पाटील

Aprna

काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या ट्विटवर माणिकराव ठाकरेंनी दिली ही प्रतिक्रिया 

News Desk

राज्यात ‘शेत तेथे मत्स्यतळे’ योजना राबविणार! – सुधीर मुनगंटीवार

Aprna