HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यात कोरोना टेस्टींग वाढवण्याची गरज – प्रकाश जावडेकर 

पुणे | देशात आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. महाराष्ट्रात सुरुवातीला मुंबई कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. मात्र, आता पुण्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढली आहे.याला आळा घालण्याकरता आता नागरिकांच्या कोरोना टेस्टिंग वाढण्याची गरज आहे अस मत केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आज (५ सप्टेंबर) पुणे दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी शहरासह जिल्हयातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अधिकारी उपस्थित होते. पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी विभागीय स्तरावरचा कोरोना स्थितीची सध्यस्थितीच सादरीकरण केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासमोर सादर केले.

यावेळी प्रकाश जावडेकर यांनी अधिकारी यांना टेस्टिंग वाढविण्याच्या सुचना केल्या आहेत. तसेच जिथे गंभीर परिस्थिती आहे तिथे अधिक लक्ष देत त्यामागची कारणे शोधुन तातडीने उपाययोजना करण्याच्या सुचनाही जावडेकरांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत .तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, आणि पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनीही शहरातील कोरोना स्थितीचे सादरीकरण केले. यावेळी त्यांनीही कोरोनाचे रुग्ण वाढण्यामागची कारणे जावडेकर यांना सांगितली.केंद्र सरकार नागरिकांना कोरोनापासुन दिलासा देण्याकरता डरो मत सावधानी करो असा नारा दिला होता. याबद्दल नागरिकांमध्ये प्रबोधन केले पाहिजे अशा सुचनाही केल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोपीचंद पडळकर हे सडक्या मानसिकतेचा कीडा | महेश तपासे

News Desk

‘महाराष्ट्र बोर्डाने’बारावीच्या निकालाचा फॉर्मुला केला जाहीर

News Desk

लातूरमध्ये देशातील पहिल्या मोफत ऑटिजम सेंटरचे जयंत पाटलांच्या हस्ते उद्घाटन

News Desk