HW News Marathi
Covid-19

देशात आजपासून 18 वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण, मुंबईत मात्र 30 वर्षांवरील नागरिकांचं होणार लसीकरण

मुंबई | देशभरात आजपासून (21 जून) 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांचं मोफत लसीकरणाला सुरुवात झाली असून मुंबईत मात्र आजपासून 18 ते 29 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण होणार नाही. गर्दी टाळण्याच्या दृष्टीनं आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. कोरोना लसींचं उत्पादन करणाऱ्या उत्पादकांकडून एकूण लसीच्या 75 टक्के भाग भारत सरकार स्वतः खरेदी करुन राज्य सरकारांना मोफत देणार आहे. तसेच भारतात तयार होणाऱ्या लसींपैकी 25 टक्के लसीचे डोस खाजगी रुग्णालयं थेट विकत घेऊ शकणार आहेत. तशी परवानगी केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.

खाजगी रुग्णालयं कोरोना लसीच्या निर्धारित किमतीहून एका डोसवर अधिकाधिक 150 रुपये सर्विस चार्ज आकारू शकणार आहेत. यावर लक्ष ठेवण्याचं काम राज्य सरकार करणार आहे. केंद्र सरकार राज्यांची लोकसंख्या, संसर्ग झालेल्यांची संख्या आणि लसीकरणाचा वेग या सर्व बाबींचा सारासार विचार करुन लसींचे डोस पुरवणार आहे.

विशेष म्हणजे, अनेक राज्य सरकारांनी सुचवले होते की, त्यांना स्थानिक आवश्यकतानुसार लसींची थेट खरेदी करण्याची परवानगी देण्यात यावी. यानंतर भारत सरकारने मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केली होती. त्यानंतर मोदींनी जनतेला संबोधित करताना 18 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण भारत सरकार मोफत करणार असल्याचं जाहीर केलं होतं. मोदी म्हणाले होते की, “देशातील सर्व नागरिकांच्या लसीकरणाची सर्व जबाबदारी केंद्र सरकार घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना केंद्राकडून मोफत लस दिली जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारला लसीकरणासाठी काहीही खर्च करावा लागणार नाही. लसीकरणाची 25 टक्के जबाबदारी ही राज्य सरकारांची होती. ती जबाबदारीही भारत सरकार घेईल. येत्या 2 आठवड्यांत ही व्यवस्था लागू केली जाईल. या दोन आठवड्यांत केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक तयारी करतील.

भारत सरकार स्वतः लस उत्पादकांकडून एकूण लस उत्पादनापैकी 75 टक्के खरेदी करुन ती राज्य सरकारांना विनाशुल्क देईल, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.” लसीबाबत अफवा पसरवणाऱ्या लोकांनाही मोदींनी इशारा दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, “जे लोक लसीबद्दल संशय निर्माण करत आहेत आणि अफवा पसरवत आहेत ते निरपराध नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. अशा अफवांबद्दल सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.”

मुंबईत आजपासून 18 ते 29 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण नाही, गर्दी टाळण्यासाठी महापालिकेचा निर्णय

मुंबईत आजपासून 18 ते 29 या वयोगटाचं लसीकरण करण्यात येणार नाही. गर्दी टाळण्याच्या दृष्टीनं मुंबई महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे. केंद्रानं जाहीर केल्यानुसार आजपासून देशभरात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण सुरु होणार आहे. परंतु, गर्दी टाळण्याच्या दृष्टीनं मुंबई महापालिकेनं दोन गटांत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत आजपासून 18 ते 29 या वयोगटाचं लसीकरण करण्यात येणार नसून 30 ते 44 वयोगटाच्या लसीकरणाला प्राधान्य दिलं जाणार आहे.

जर तुम्ही सरकारी रुग्णालयात लस घेत असाल तर या बाबी ठेवा लक्षात

– लसीकरण विनामूल्य असेल.

– Co-Win अॅपवर पूर्व-नोंदणी करणे अनिवार्य नाही. कारण सरकार आजपासून स्पॉट नोंदणीसाठी परवानगी देण्यात आली आहे.

जर खाजगी रुग्णालयात जात असाल तर हे लक्षात ठेवा

– Co-Win अॅपवर नोंदणीची आवश्यकता नाही

– कोवॅक्सिन लसीसाठी ₹1,410, कोविशील्ड लसीसाठी ₹790 आणि स्पुतनिक V या लसीसाठी ₹1,145 ही किंमत निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे यापेक्षा जास्त पैसे देऊ नका.

– कारण केंद्राने खासगी रुग्णालयांमध्ये या लसींची कमाल किंमत निश्चित केली आहे.

लसीकरणाचे प्रमाणपत्र खरे की खोटे? कसे ओळखाल

– गेल्या काही दिवसांपासून कोरोना लसीच्या घोटाळ्याची अनेक प्रकरण चर्चेत आली आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणाचे योग्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच यासाठी योग्य लस प्रमाणपत्र आवश्यक आहे.

– या लिंकवर क्लिक करा. यात तुम्हाला क्यूआर कोड स्कॅन करण्याचा पर्याय असेल.त्या बटणावर क्लिक करा.

-त्यानंतर मोबाईलमधील कॅमेऱ्याच्या मदतीने लसीकरण प्रमाणपत्रावरील क्यूआर कोड स्कॅन करा.

यानंतर पडताळणी केल्यावर तुम्हाला नाव, वय, लिंग, प्रमाणपत्र आयडी, ते जारी केल्याची तारीख, लसीकरणाच्या सुविधा इत्यादी सर्व गोष्टी दर्शवतील.

-जर तुमचे प्रमाणपत्र खोटे असेल तर तो क्यूआर कोड स्कॅन केल्यावर तुमचे प्रमाणपत्र अमान्य असल्याचे सांगेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील कोरोना टेस्टिंग लॅब्सची संख्या ४० वरून ६० करण्याचा प्रयत्न !

News Desk

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा अखेर ४ लाखांच्या खाली!

News Desk

परभणी जिल्हा कोरोनामुक्त झाला असून तो पुढेही कोरोनामुक्तच राहिल -नवाब मलिक

News Desk