HW News Marathi
Covid-19

लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला १ कोटींचा टप्पा

मुंबई | देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने प्रथम क्रमांकावर असून आज(११ एप्रिल) राज्याने त्यात विक्रमी नोंद केली असून आतापर्यंत सुमारे १ कोटीहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत १ कोटी ३८ हजार ४२१ जणांना लस देण्यात आली असून सायंकाळपर्यंत या आकडेवारीत अजून वाढ होईल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. याविक्रमी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे कौतुक केले आहे.

देशात कोरोनाने आपलं रौद्र रुपधारण केलं आहे. आज (११ एप्रिल) देशभरात १ लाख ५० हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. एका दिवसात आत्तापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. तर मृत्यूची संख्याही वाढत आहे ही चिंतेची बाब ठरत आहे. यामुळे प्रशासनाने लसीकरणाची गती वाढवली आहे. आज दिवसात कोविड-१९ चे लसीकरण ९.८० कोटी पेक्षा जास्त झाले आहे. तसेच, आजपासून १४ एप्रिलपर्यंत लस उत्सव मोदींनी साजरा करण्याचे आवाहन जनेतला केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजेश टोपे यांचे पोलीस प्रशासनाला निर्देश, मंठातील प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी गृहमंत्र्यांशी चर्चा

News Desk

HW Exclusive | MPSC च्या विद्यार्थ्यांना घरी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू !

News Desk

ठाकरे सरकारकडून ‘दिवाळी’साठीच्या मार्गदर्शक सूचना जारी, कशावर बंदी ? जाणून घ्या

News Desk