मुंबई | कोरोना लसीकरणाबाबतची मोठी बातमी समोर येत आहे. १६ जानेवारीपासून देशभरात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच, पहिल्या टप्प्यात ८ लाख लोकांना कोरोना लस देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. त्यामुळे गेले अनेक महिने ज्या कोरोनाशी आपण सगळे लढत होतो आणि त्यावरील लस कधी येणार याच्या प्रतिक्षेत असताना १६ तारखेपासून लसीकरणाला सुरुवात होत आहे.
Vaccination drive to kick off on 16th Jan, 2021. Priority will be given to the healthcare workers and the frontline workers, estimated to be around 3 cr, followed by those above 50 years and the under-50 population groups with co-morbidities numbering around 27 cr: Govt of India pic.twitter.com/M4CzcBzMqf
— ANI (@ANI) January 9, 2021
दरम्यान,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (११ जानेवारी) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची ऑनलाइन बैठक बोलावली आहे. भारतात दोन लशींना (Corona Vaccine) परवानगी देण्यात आली आहे. त्यापैकी कोव्हिशील्ड ही सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेली लस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे आणि त्याचेच डोस प्रथम देण्याचं ठरलं आहे. ११ जानेवारीला दुपारी ४ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतील.राज्यातली कोविड परिस्थिती, कोरोना रुग्णांची संख्या आणि त्यावर योजलेले उपाय यांची चर्चा होईल. तसंच कोरोना लसीकरणाची मोहीम कशी राबवायची याबाबतही आराखडा चर्चेत असेल.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.