HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

#CoronaOutbreak | चिंताजनक ! राज्यात आजच्या दिवसात ७२ नव्या रुग्णांची नोंद

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आज (३१ मार्च) अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता थेट ३०० पार गेला आहे. राज्यात इतक्या मोठ्या संख्येने वाढलेला कोरोनाग्रस्तांचा हा आकडा निश्चितच राज्याची चिंता वाढवणारा आहे. राज्यात सोमवारी (३० मार्च) रात्रीपर्यंत राज्यात २२० कोरोनाबाधितांशी नोंद करण्यात झाली होती. त्यानंतर, आज अगदी दुपारपर्यंत २४३ असलेला कोरोनाबाधितांचा आकडा अवघ्या काही तासांमध्ये थेट ७२ ने वाढून ३०२ वर पोहोचला आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण मुंबईतील असल्याची माहिती मिळत आहे.

राज्यात केवळ एका दिवसात ‘कोरोना’चे ७२ नवे रुग्ण

मुंबई – ५९
अहमदनगर – ३
पुणे – २
ठाणे – २
केडीएमसी – २
नवी मुंबई – २
वाशी विरार – २

राज्यातील एकूण ३०२ पैकी ३९ पूर्ण बरे झाले तर १० जणांचा मृत्यू

राज्यात आज एकूण ४०६ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६३३१ नमुन्यांपैकी ५७८० जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३०२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ३९ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात २३ हजार ९१३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १४३४ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

देशभरातील प्रयोगशाळांचे जाळे विस्तारणार 

‘कोरोना’ तपासणीसाठी देशभरातील प्रयोगशाळांचे जाळे विस्तार करण्यात आला असून ‘आयसीएमआर’च्या अनुमतीने सध्या राज्यात १० शासकीय आणि १३ खाजगी अशा एकूण २३ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी सिध्द झाल्या आहेत. यातील खाजगी प्रयोगशाळांकडील अहवालांचे मूल्यमापन करुन त्यानंतर त्यांचे अहवाल अंतिम करण्यात येत आहेत.

राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या

मुंबई – १५६
पुणे – ३४
पिंपरी चिंचवड – १२
सांगली – २५
नागपूर – १६
कल्याण – ९
नवी मुंबई – ८
अहमदनगर – ८
ठाणे – ७
वसई विरार – ६
यवतमाळ – ४
पनवेल – २
सातारा – २
कोल्हापूर – २
बुलडाणा – २
पालघर- १
उल्हासनगर – १
गोंदिया – १
औरंगाबाद – १
सिंधुदुर्ग – १
रत्नागिरी – १
जळगाव- १
नाशिक – १
इतर राज्य (गुजरात) – 01

एकूण आकडा – ३०२

Related posts

कश्मीरात जो हिंसाचार, दहशतवाद आणि फुटीरतावाद बोकाळला आहे त्यास एकटा सिद्धू जबाबदार नाही | ठाकरे

News Desk

बलात्कार प्रकरणी आसाराम बापूचा मुलगा नारायण साईला जन्मठेपेची शिक्षा

News Desk

त्यांच्या झेंड्याचा दांडाच आमच्या हातात आला आहे !

News Desk