HW News Marathi
Covid-19

येत्या २ वर्षांत कोरोनाचा संपूर्ण नायनाट होईल | WHO

नवी दिल्ली | संपूर्ण जगभराला गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाचा घट्ट विळखा आहे. तर आतापर्यंत जगभरात तब्बल २.२५ कोटींहूनही अधिक कोरोनाबाधितांची नोंद झालेली आहे. कोरोनावरची लस कधी येणार ? संसर्ग नियंत्रणात कधी येणार ? त्याचप्रमाणे जनजीवन पुन्हा एकदा सुरळीत कधी होणार ? याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. याच पार्श्वभूमीवर आता, जागतिक आरोग्य संघटनेकडून एक दावा करण्यात आला आहे. “येत्या २ वर्षांत कोरोनाचा संपूर्ण नायनाट होऊ शकतो”, असे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे. यावेळी WHO ने १९१८ सालचे एक उदाहरण दिले आहे.

“सध्याच्या काळात कोरोनाशी लढण्यात आम्ही अधिक सक्षम झालो आहोत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध होत आहे. आम्हाला आशा आहे की कोरोनाचे हे संकट कमीत कमी येत्या २ वर्षात संपू शकेल. १९१८ साली जगभरात ‘स्पॅनिश फ्लू’ने धुमाकूळ घातला होता. या स्पॅनिश फ्लूचा नायनाट होण्यासाठीही जवळपास २ वर्षांचा कालावधी लागला होता. त्याप्रमाणेच, कोरोनाचाही संपूर्ण नायनाट होण्यासाठी किमान पुढची २ वर्षे लागू शकतात”, असे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे. WHO चे प्रमुख टेड्रोस अधानोम यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सरकारनंच अदर पुनावालांना धमकी दिली, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

News Desk

राज्य शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत सुधारित आदेश जारी

News Desk

कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ, २४ तासांत ५४,०६९ रुग्णांची नोंद

News Desk