HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनामुळे राज्यातला लॉकडाऊन वाढणार ?

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. येत्या १४ एप्रिलला या लॉकडाऊनचे २१ दिवस पुर्ण होणार आहेत. परंतू, महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा पाहता हा लॉकडाऊन वाढण्याची शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एका माध्यमाशी बोलताना वर्तवली.

“देशव्यापी लॉकडाउनची घोषणा करण्याच्या दोन दिवस आधीच आम्ही राज्यामध्ये लॉकडाउनची घोषणा केली होती. त्याआधीही आम्ही राज्यातील शहरांमध्ये निर्बंध लागू केले होते. अनेक सर्वाजनिक ठिकाणे बंद केली होती. मुंबईसारख्या शहरांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखणे हे कठी काम आहे. त्यामुळे लॉकडाउन संपवण्याचा निर्णय हा पूर्ण विचार करुनच घेणे गरजेचे आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये हा कालावधी वाढवावा लागणार आहे, असे माझं वैयक्तीक मत आहे”, असे टोपे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मुंबईत कोरोनाचा संसर्ग रोखणे हे सर्वात मोठे आव्हान सरकारसमोर आहे. महापालिका, पोलीस व आरोग्य विभागाच्या टीम त्यासाठी अहोरात्र झटत आहेत. जवळपास १५० परिसर सील करण्यात आले आहेत. संशयितांना ओळखण्यासाठी स्वतंत्र टीम कार्यरत आहेत,’ असेही टोपे यांनी स्पष्ट केले. तसेच, राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आणि किती रुग्ण बरे झाले याची माहितीही त्यांनी ट्विटरवरुन काल (३ एप्रिल) दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ढाई आखर” राज्यस्तरीय पत्रलेखन स्पर्धेत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतस‍िंह कोश्यारी यांना प्रथम पारितोषिक

News Desk

राहुलजी गांधींच्या प्रतिमेला जोडे मारण्याचे आंदोलन म्हणजे हीन राजकारण! – बाळासाहेब थोरात

Aprna

महाराष्ट्राच्या घराघरातल्या माता-भगिनी-कन्यांना मान, सन्मान, सुरक्षितता देत आत्मनिर्भर करुया! – अजित पवार

Aprna