HW News Marathi
महाराष्ट्र

जालन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण, जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त तैनात

जालना | जालना शहरातील दुःखी नगर भागातील ६५ वर्षाच्या महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. सदर महिला एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते, मात्र, सदर महिलेमध्ये कोरोनाचा संशशावरून तिला पुढील उपचारासाठी तिला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर आज (६ एप्रिल) महिलेचा अहवाल आल्यानंतर तिला कोरोनाची लागण झाल्याचे समजले, ही माहिती जालना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली आहे. सदर महिलाने नुकतेच सौदी अरेबीयातून आल्याची माहिती मिळाली आहे. जालना शहरात कोरनाचा रुग्ण आढळून आला नव्हता. त्यामुळे जालनेकरांत समाधान होते. परंतु आता कोरोनाचा पहिल्यांदाच महिला रुग्ण आढळून आल्याने जालनेकरांच्या मनात धडकी भरली आहे.

जालना शहरात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने पोलीस बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयाकडून जिल्हा प्रशासनाला नुकताच अहवाल देण्यात आला असल्याचेही सांगण्यात येत आहे. जालना जिल्ह्यात एकही रुग्ण नव्हता, जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून २१३ जनांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तर काल ३२ जनांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी १ जनाचा रिपोर्ट हा पॉझिटीव्ह आला आहे. तर इतर सर्व रिपोर्ट हे निगेटीव्ह आले आहेत. सदरील रुग्णावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुरुवातीपासून आतापर्यंत २१३ जनांपैकी १७६ जनांचे रिपोर्ट आले असून ते निगेटीव्ह आहेत. तर उर्वरीत काही जनांचे रिपोर्ट आज सायंकाळपर्यंत येणे अपेक्षीत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“भाजपनेच राज ठाकरेंचा गेम केला!” – महेश तपासे

News Desk

तासगावचा रथोत्सव होणार उत्साहात साजरा

News Desk

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील मार्गावरील एसटीची वाहतूक बंद राहणार

News Desk