HW News Marathi
Covid-19

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांसाठी विशेष टास्क फोर्सची स्थापन करणार !

पुणे | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थिती आढावा बैठक घेतली. यावेळी आज (१४ मे) पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले आहे. “पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत रुग्णसंख्या वाढीचा वेग मंदावला असून येथील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे, ही सकारात्मक बाब आहे”, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

राज्यात येणाऱ्या संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देखील राज्य सरकारने नियोजनाला सुरुवात केली आहे. ही कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते असे तज्ज्ञांचे मत असून या पार्श्वभूमीवर सर्व बालरोगतज्ज्ञांची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन त्यांना लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास सांगितलायचे अजित पवार यांनी सांगितले आहे.

लहान मुलांसाठी बेड राखीव ठेवण्याच्या सूचना !

तहान लागल्यावर विहीर खोदण्याऐवजी आताच सर्व रुग्णालयात लहान मुलांसाठी बेड राखीव ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. लहान मुलांच्या आरोग्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. त्याद्वारे पालकांनी कोणती काळजी घ्यावी, याची देखील माहिती दिली जाणार असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले आहे.

कोवॅक्सीनचे उत्पादन पुण्यात सुरु होणार !

“भारत बायोटेकने पुण्यात लस उत्पादित करण्याचा मानस व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्यात त्यांना लस उत्पादनासाठी मागणी केलेली जमीन देण्यात येणार आहे. तसेच वीज आणि इतर मागण्यांचाही तात्काळ निर्णय घेण्यात येत आहे. कोवॅक्सीनचे उत्पादन पुण्यात सुरु झाल्यास महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा होऊ शकतो, अशीही अपेक्षा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात कोरोना रुग्णांचा आकडा १० लाखांच्या पार !

News Desk

लॉकडाऊनबाबात मुख्यमंत्री आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता – अस्लम शेख

News Desk

उच्च न्यायालयाच्या तंबी नंतर आता सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला ‘यासाठी’ नोटीस

News Desk