HW News Marathi
Covid-19

मंत्रालयात आणखी एका आणखी एका प्रधान सचिवांना कोरोनाबाधित

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता मंत्रालयातील आणखी एका प्रधान सचिवांना कोरोाची लागण झाल्याची माहिती मिळली आहे. यामुळे प्रधान सचिव राहत असलेल्या चर्चगेट येथील यशोधन इमारतीचा चौथा मजला सील प्रशासनाने सील केला आहे. या इमारतीमध्ये राज्य प्रशासनाचे वरिष्ठ अधिकरी राहतात. आयएएस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने मंत्रालयात एकच खळबळल उडाली आहे.

दरम्यान, याआधी मंत्रालयातील एका प्रधान सचिवांसह सहा जण कोरोना बाधा झाली होती. आता मंत्रालयातील बाधितांचा आकडा सातवर पोहोचला आहे. यापूर्वी मंत्रालयातील अधिकारी कोरानाबाधित आढळल्यानंतर दोन दिवस मंत्रालय बंद करण्याची वेळ सरकारवर आली होती. यानंतर निर्जंतुकीकरण केल्यानंतर मंत्रालय पुन्हा सुरू करण्यात आले होते. आतापर्यंत मंत्रालयात २ प्रधान सचिव, एक उपसचिव, २ सफाई कर्मचारी, एक बांधकाम विभागातील कंत्राटी कामगार आणि मंत्रालयात उभ्या असणार्‍या अ‍ॅम्ब्युलन्समधील डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाची लस आधी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी लोकांसमोर येऊन घ्यावी, प्रकाश आंबेडकरांची मागणी

News Desk

आता तरी सरकारला जाग येणार का?

News Desk

Corona World : जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या ४६ लाखांच्या वर, तर १७ लाखांहून अधिक कोरोना मुक्त

News Desk