HW News Marathi
महाराष्ट्र

#Coronavirus : नायर रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह महिलेने केली आत्महत्या

मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा २६८४ इतका झाला आहे. तसेच, आज (१५ एप्रिल) धक्कादायक बातमी समोर आली. नायर रुग्णालयात २८ वर्षीय कोरोनाबाधित महिलेने गळफास लावून आत्महत्या केली आहे. रुग्णालयाच्या बाथरुमध्ये ओढणीने गळफास लावून घेतला. दरम्यान, याचा अधिक तपास पोलिस घेत आहेत.

कोरोनाच्या वाढत्या संख्येने अधिक भीतीचे वातावरण पसरत आहे. मुंबईतील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत आज पन्हा ५ नवे कोरोना पॉझिटिव्ह तर दादरमध्ये २ आणि माहिममध्ये १ असे नवे ८ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, दादरमधील कोरोनाबाधितांची संख्या २१ वर गेली असून, धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा हा ६० वर पोहोचला आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २६८४

मुंबई – १७५६

ठाणे मंडळ – ३१९

नाशिक मंडळ – ७७

पुणे मंडळ – ३५८

कोल्हापूर मंडळ – ३९

औरंगाबाद मंडळ – २५

लातूर मंडळ – १३

अकोला मंडळ – ४१

नागपूर मंडळ – ४५

इतर राज्य – ११

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MPSCExam : राजकीय स्वार्थाला बळी पडू नका – आदित्य ठाकरे

News Desk

अभिनेत्री कंगना राणावत मुंबईत दाखल

News Desk

मराठा आरक्षण मिळवण्यासाठी संभाजीराजेंनी मांडले ३ पर्याय

News Desk