HW News Marathi
महाराष्ट्र

कस्तुरबा रुग्णालयात मुंबईतील ६ ‘कोरोना’ संशयित दाखल

मुंबई | कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाची लागण झालेल्यांच्या संख्येत वाढ होत असून आता महाराष्ट्रातही हा विषाणू फैलवण्यास सुरुवात झाली आहे. पुण्यात ५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. कोरोनाग्रस्त दाम्पत्याची नुकतेच दुबईवरून आले आहे. या दाम्पत्यांनी मुलीसह त्यांना मुंबईहून पुण्याला घेऊन येणाऱ्या ओला कार चालकाचाही समावेश आहे. संबंधित दाम्पत्य नुकतेच दुबईहून आले होते. ते दुबईहून मुंबईला विमानाने आले. त्यानंतर मुंबईहून त्यांनी ओला करुन पुण्यापर्यंतचा प्रवास केला. या प्रवासात त्यांच्यासोबतच्या चालकालाही कोरोना झाला आहे.दरम्यान, हे पाच रुग्ण अनेकांना भेटले आहेत.

दरम्यान, पुण्यातील कोरोना ग्रस्तांसोबत दुबईवरून मुंबईत आलेल्या कुटुंबासोबत ६ जणांना शोध लागला आहे. या व्यक्तींना वैद्यकीय चाचणीसाठी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, ज्या देशामध्ये करोनाची लागण झाली आहे. हा विषाणू फार वेगाने पसरत असल्याकारणाने पुण्यात पालिका, रुग्णालये सज्ज झाली आहेत. पुण्यातील अनेक शाळांना रविवारपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. यात प्रामुख्याने डी. एस. के शाळा, पवार पब्लिक शाळा आणि विद्या प्रतिष्ठान शाळा यांचा समावेश आहे.

तसेच करोना संदर्भात जनजागृती करण्यासाठी सरकारने कॉलर ट्यून जारी केली आहे. जेव्हा आपण कोणाला फोन लावतो तेव्हा आधी खोकण्याचा आवाज येतो आणि पुढे माहिती दिली जाते. या कॉलर ट्यूनमुळे जनतेत असंतोष निर्माण झाला आहे. मात्र भारतासारखा देशामध्ये अशा गंभीर आजाराबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी कॉलर ट्यूनची मदतच होईल असे जेजे रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. रेवंत काविंदे यांनी सांगितले.

  • करोना विषाणू आणि आजारावर नियंत्रण आणण्यासाठी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालय यांमध्ये विलगिकरण कक्ष तयार करण्यात आला आहे.
  • केंद्र सरकारच्या आदेशानुसार विमानतळावरील प्रत्येक प्रवाशांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असून ज्यांच्यामध्ये करोनाची लक्षणे दिसून येताच तातडीने त्यांना विलगिकरण कक्षात दाखल करण्यात येणार आहे.
  • मुंबई, पुणे, यवतमाळ, नांदेड यांसारख्या शहरात देखील परेशावरून आलेल्या लोकांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोषक वातावरणामुळे राज्यात उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीत वाढ! – उपमुख्यमंत्री

Aprna

आता फडणवीस अन् राणे दोघेही जोड्याने मुख्यमंत्रीपदाची स्वप्न बघतील !

News Desk

एसटीच्या तिकीट दरात १८ टक्के वाढ

News Desk