HW News Marathi
Covid-19

सीरमची कोरोना लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याची मागणी 

पुणे | ऑक्सफर्डच्या कोरोना लसीच्या वापरासाठी परवानगी देण्याची मागणी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटनं डीसीजीआयकडे केली आहे. कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागणारी सीरम ही देशातील पहिली कंपनी आहे. ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सीरम इन्स्टिट्यूटमध्ये सध्या सुरुवात झाली आहे. कंपनीने महामारी दरम्यान, विस्तृत स्तरावर वैद्यकीय गरजा आणि जनहित यांचा हवाला देत सीरमने कोविशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे. याआधी शनिवारी अमेरिकी औषध निर्माती कंपनी फायझरने केंद्र सरकारकडे भारतात लसीकरणासाठी परवानगी मागितली आहे.गेल्याच आठवड्यात फायझरला ब्रिटन आणि बहारीनने लसीकरणाला परवानगी दिली आहे. पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये या लसीच्या वापराला सुरुवात होत आहे.

आता या कंपनीने भारतात लसीकरणासाठी तात्काळ परवानगी मागितली आहे. याला भारत सरकार कसा प्रतिसाद देतो ते पहावं लागेल. तसेच एसआयआयने आयसीएमआरसोबत एकत्र येऊन रविवारी देशाच्या विविध भागांत ऑक्सफर्डच्या कोविड-19ची लस ‘कोविशील्ड’च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचं परीक्षण केलं.नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अधिकृत सुत्रांनी माहिती दिली की, एसआयआयच्या अर्जाचा हवाला देऊन ते म्हणाले की, कंपनीने सांगितलं आहे की, क्लिनिकल परीक्षणाच्या चार डेटामध्ये हे समोर आलं आहे की, कोविशिल्ड कोरोनाची लक्षण असणाऱ्या रुग्णांमध्ये खासकरुन कोरोनाच्या गंभीर रुग्णांमध्ये खास प्रभावी ठरते. चारपैकी दोन चाचण्यांचा डेटा ब्रिटन आणि एक-एक भारत आणि ब्राझीलशी संबंधित आहे.

आपातकाली वापरासाठी परवानगी म्हणजेच, इमर्जेंसी यूज अथॅराइजेशन. वॅक्सिन आणि औषधं, तसेच डायग्नोस्टिक टेस्ट्स आणि मेडिकल डिव्हाइजेसच्या वापरासाठी परवानगी मागितली जाते. भारतात यासाठी सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशन (CDSCO) रेगुलेटरी बॉडी आहे. वॅक्सिन आणि औषधांसाठी हे अप्रूवल, त्यांची सुरक्षितता आणि त्यांचा परिणामांचं निरिक्षण करुन दिलं जातं. यासाठी क्लिनिकल ट्रायलचा डेटा तपासण्यात येतो. साधारणतः कोणत्याही लसीला मंजुरी मिळण्यासाठी अनेक वर्ष लागतात. आतापर्यंतचा सर्वात कमी अप्रूवल टाइम साडेचार वर्षांचा आहे. आपातकालीन परिस्थितीत जसं आता आहे, जगभरातील देशांमध्ये अशी व्यवस्था आहे की, औषध आणि लसीचे परिणाम उत्तम असतील तर त्यांना मंजूरी देण्यात येऊ शकते. अंतिम अप्रूवल संपूर्ण डेटाचं परिक्षण केल्यानंतर दिले जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा

News Desk

राज्यातील 14 जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, निर्बंध शिथील

Aprna

३०० हून अधिक कोरोनाग्रस्त महिलांच्या प्रसुती, नायर रुग्णालयाने दिलेले योगदान अतुलनीय !

News Desk