HW News Marathi
महाराष्ट्र

#CoronaVirus | …म्हणून चंद्रकांत पाटील आपली पोलीस सुरक्षा परत करणार

मुंबई | देशात वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर कृपया अत्यावश्यक काम नसल्यास घराबाहेर पडू नका, असे आव्हान पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पोलीस प्रशासन, डॉक्टर्स अशा सर्वांकडून वारंवार केले जात आहे. असे असतानाही काही लोक विनाकारण घराबाहेर पडत असल्याने पोलीस प्रशासनावर मोठा ताण पडत आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली पोलीस सुरक्षा परत करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी भाजप नेते विनोद तावडे यांनी देखील अशाच पद्धतीचा निर्णय घेतला होता.

“कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधान मोदींच्या आवाहनानुसार लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून, देशात संचारबंदी लागू आहे. याचा पोलीस प्रशासनावर ताण पडत आहे.याचा विचार करून परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत मी माझी पूर्ण सुरक्षा परत करण्याचा निर्णय घेतला आहे”, असे ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्याचप्रमाणे, चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरूड मतदारसंघात मोफत मास्क आणि सॅनिटायझर्सचे वाटपही केले आहे. त्याचप्रमाणे, भाजपचे महाराष्ट्रातील आमदार आणि खासदार आपले एका महिन्याचे वेतन ‘भाजप आपदा कोष’मध्ये जमा करणार असल्याची माहिती भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

“कोरोनोसारख्या संकटाचा सामना करण्यासाठी जनसामान्यांना मदत करण्यासाठी ही रक्कम वापरण्यात येईल”, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे. यापूर्वी राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून याबाबतची घोषणा करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जनतेच्या तक्रारी सोडवण्यासाठी दर महिन्याला होणार लोकांसमवेत बैठक

News Desk

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडूनही श्रद्धांजली

News Desk

नरेंद्र मोदींना ‘मोदीभक्तांकडून’ अनौखी भेट!

News Desk