HW News Marathi
महाराष्ट्र

Independence Day | देशभरात ७२ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

मुंबई | ७२ व्या स्वातंत्र्य दिन आज संपुर्ण देशभरात उत्साहात साजरा होत आहे. राजधानी दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशवासीयांना संबोधित करत आहेत . २०१९ लोकसभा निवडणुकांपुर्वी मोदींचे हे अखेरचे भाषण आहे.

मुंबईतील राजभवन राज्यपाल सी. विद्यासागर राव तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. तसेच स्वातंत्र दिनाच्या पुर्व संध्येला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन आणि बृहन्मुंबई महानगरपालिक मुख्यालय तिरंगाच्या आकर्षक अशा रोषणाईत नाहून गेले.

 

तसेच मुंबईतील मुलुंडमधील कारगील युद्धापासून संभाजी मैदानावर मध्यरात्री १२ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. ध्वजारोहणानंतर शहीदांना श्रद्धांजली वाहिली जाते. घाटकोपरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरही मध्यरात्री १२ वाजता दिव्यांग व्यक्तींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Related posts

सरपंच परिषद संघटनेकडे शरद पवारांनी व्यक्त केला आशावाद…

News Desk

राज्यात सत्त स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होईल | सुधीर मुनगंटीवार

News Desk

बारावीच्या निकालाबाबत अद्याप निर्णय नाही!

News Desk