नवी दिल्ली | कोविड १९ ची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे आणि त्यात डेल्टा व्हेरिएंटचं थैमान सुरु झाला आहे. या सगळ्यातून लवकरात लवकर सुटका व्हावी म्हणून भारतात लसीकरणावर भर दिल जात आहे. ह्या सगळ्यातून कसा बचाव करावा याचा उत्तम उपाय एम्स प्रमुखांनी सांगितलं आहे. एम्स रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं कि “डेल्टा व्हेरिएंट बद्दल अद्याप सगळी मैहिती मिळालेली नाही, त्याच्या संसर्गाचा, मृत्यूची माहिती स्पष्ट होत नाही. परंतु आपण जर कोरोनाच्या प्रतिबंधाचं पालन केल तर सुरक्षित राहू शकतो”, अस त्यांनी नमूद केल.
कोरोना नियमांचा पालन हाच खरा उपाय
कोरोना पासून वाचण्यासाठी मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिन्ग पाळणे हे गरजेचे आहे, ह्या सगळ्याची सूचना वारंवार दिली जात आहे असाही त्यांनी सांगितलं. देशात कोरोनाचा दुसरा प्रकार डेल्टा व्हेरिएंट थैमान घालत आहे आणि १० राज्यांमध्ये ह्याचे रुग्ण आढळे आहेत.
There isn't much data on Delta plus variant to suggest it's more infectious, causing more deaths, or has developed significant immune escape mechanism. But if we follow COVID appropriate behaviour, we'll be safe against any of emerging variants: Dr Randeep Guleria, AIIMS Director pic.twitter.com/97q87dWyy5
— ANI (@ANI) July 1, 2021
कोवॅक्सिन कोरोनाच्या डेल्टा आणि अल्फा व्हेरिएंटवर प्रभावी
भारतात बायोटेक कंपनीने विकसित केलेले कोवॅक्सिन लस अल्फा आणि डेल्टा व्हेरिएंट नष्ट करण्याचं दिसून येतंय. कोवॅक्सिन घेतलेल्या दोन नागरिकांचे रक्ताचे सॅम्पल्स चाचणीसाठी पाठिविण्यात आले होते तेव्हा अल्फा आणि डेल्टा व्हेरिएंट विरुद्ध लढण्यासाठी अँटीबॉडीएस आढळून आले असे अमेरिकेच्या आरोग्य संस्थेकडून सांगण्यात आले.
देशात सलग दुसऱ्या दिवशीही कोरोना रुग्ण संख्येत वाढ
देशात आतापर्यंत 2 कोटी 94 लाख 88 हजार 918 रुग्ण बरे झाले आहेत. तर 3 लाख 99 हजार 459 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 5 लाख 23 हजार 257 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 33 कोटी 57 लाख 16 हजार 19 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 48,786
देशात 24 तासात डिस्चार्ज – 61,588
देशात 24 तासात मृत्यू – 1,005
एकूण रूग्ण – 3,04,11,634
एकूण डिस्चार्ज – 2,94,88,918
एकूण मृत्यू – 3,99,459
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 5,23,257
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 33,57,16,019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.