HW News Marathi
Covid-19

धोका वाढला ! एकट्या मुंबईत ३ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित

मुंबई । राज्यात कोरोनाचा कहर अद्याप सुरूच आहे. राज्याच्या कोरोनाबाधितांबाबत आज (१९ मार्च) जारी झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत 25 हजार 681 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर मुंबईतील कोरोनास्थिती चिंताजनक झाली असून एकट्या मुंबई शहरात गेल्या २४ तासांत तब्बल 3,062 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. राज्य शासन आणि प्रशासनासाठी हा धोक्याचा इशारा मानला जात आहे.

राज्याच्या कोरोनास्थितीबाबत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात 14 हजार 400 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर याच एका दिवसात राज्यातील तब्बल 70 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, आतापर्यंत राज्यात एकूण तब्बल 24 लाख 22 हजार 021कोरोनाबाधितांची नोंद झाली असून त्यापैकी 21 लाख 89 हजार 965 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्यस्थितीत राज्यात 1 लाख 77 हजार 560 कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याच्या चिंतेत वाढ! आज कोरोना रुग्णांची संख्या 4 हजारपेक्षा जास्त

Aprna

कोरोनामुळे देशात १२ ऑगस्टपर्यंत रेल्वे वाहतूक बंद राहणार | रेल्वे बोर्ड

News Desk

राज्यात लॉकडाऊन काळात आतापर्यंत ९६ हजार गुन्हे दाखल

News Desk