नवी दिल्ली । कोरोनाची तिसरी लाट येण्याची आशंका दर्शवली जात आहे. या सगळ्यात एक दिलासादायक बातमी म्हणजे रुग्णांमध्ये दिसत असलेली घट. गेल्या २४ तासात देशात 41 हजार 506 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. याच कालावधीत देशात 41 हजार 526 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 895 जणांचा मृत्यू झाला आहे.
मागील काही दिवसांपासून देशातील कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी-जास्त होत आहे. 35 हजारांखाली आलेली नवीन कोरोना रुग्णसंख्या पुन्हा 45 हजारांच्या पुढे गेली होती. आता यामध्ये पुन्हा एकदा थोड्याप्रमाणात घट पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येमध्ये थोड्या प्रमाणात घट पाहायला मिळत आहे.
India reports 41,506 new cases in the last 24 hours. Active caseload currently at 4,54,118. Total Recoveries across the country so far are 2,99,75,064. pic.twitter.com/qxnYi7T7UG
— ANI (@ANI) July 11, 2021
कोरोना रुग्णांचा एकूण आकडा
एकूण कोरोनाबाधित रुग्ण – ३. ०८ कोटी
सक्रिय रुग्ण : ४,५४,1११८
एकूण कोरोनामुक्त : २,९९,७५,०६४
एकूण मृत्यू – ४,०८,०४०
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.