HW News Marathi
महाराष्ट्र

तिथे पालकमंत्री ऑक्सिजन पुरवठ्यावर बोलले, इथे ऑक्सिजनअभावी रुग्णाने प्राण सोडले!

कोल्हापूर | राज्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक होत आहे. औषधांचा तुटवडा तर आहेच पण दुसरीकडे ऑक्सिजनची कमतरताही जाणवत आहे. असं असताना कोल्हापुरात माजी सैनिकाचा ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू झाला. करवीर तालुक्यातील गिरगाव येथील ४१ वर्षीय सर्जेराव पांडुरंग कुरणे यांचं निधन झालं. हॉस्पिटलमधील ऑक्सिजन संपल्याने कुरणे यांना प्राण गमवावे लागल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आक्रमक झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं आहे.

माजी सैनिक सर्जेराव पांडुरंग कुरणे यांचा आज (१ मे) सकाळी ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू झाला. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. कोल्हापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. दररोज एक हजाराहून अधिक नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद जिल्ह्यात होत आहे. उपचाराअभावी रुग्णांचे बळी जाण्याची मालिका सुरुच आहे.

राज्यातरोज कोरोनाचे ६० हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. वेळेवर उपचार मिळत नसल्यानं अनेक रुग्णांना हालअपेष्टांचा सामना करावा लागत आहे. कोल्हापूरमध्ये एका रुग्णानं ऑक्सिजनअभावी प्राण सोडल्याची घटना घडली आहे. एकीकडे पालकमंत्री सतेज पाटील जिल्ह्याला ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही असा विश्वास व्यक्त करताना दुसरीकडे ऑक्सिजनअभावी रुग्णाची प्राणज्योत मालवली आहे.

पालकमंत्री सतेज पाटील ऑक्सिजन पुरवठ्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत असतानाच एका रुग्णानं ऑक्सिजनअभावी प्राण सोडले. सर्जेराव पांडुरंग कुरणे असं या व्यक्तीचं नाव असून त्याचं वय ४१ वर्षे होतं. रंकाळा टॉवर परिसरातील स्टेट बँकेच्या शेजारी असलेल्या महालक्ष्मी रुग्णालयात सर्जेराव यांच्यावर उपचार सुरू होते. २६ एप्रिलला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगाबादमध्ये MIM ला मोठा झटका, माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

News Desk

मी नाराज आहे, ही बातमी मुळात चुकीची आहे !

News Desk

मुंबईतील रस्ते सुधारणा कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Aprna