HW News Marathi
Covid-19

कोविड रुग्णालयातच कोरोना बाधित रुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या!

बीड | बीड शहरातील एका खाजगी कोविड रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बीड तालुक्यातील तांदळवाडी येथे राहणारे रामलिंग सानप मागील १० दिवसांपासून दीप कोविड रुग्णालयात उपचार घेत होते. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार होता. मात्र, त्यापूर्वीच सानप यांनी आत्महत्या केलीय. रुग्णालयात झालेल्या या आत्महत्येने शहरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकल नसून बीड पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे.

बीड शहरातील दीप हॉस्पिटलमध्ये आज (२१ मे) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेतली आहे. रामलिंग महादेव सानप (वय 35 रा. तांदळ्याचिवाडी ता.बीड ) असे आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव आहे. घटनास्थळी बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी धाव घेत घटनेची घेतली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहे. कोरोनाकाळामध्ये दीप हॉस्पिटल नेहमी चर्चेत राहिलेले आहे. या घटनेने पुन्हा आणखी चर्चेत आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात दिवसभरात ५६ हजार ६४७ नवीन कोरोनाबाधित, ६६९ रूग्णांचा मृत्यू

News Desk

महाराष्ट्रात आज कोरोना लसीकरणाच्या ड्राय रनला होणार सुरुवात

News Desk

चक्रीवादळात मदत व बचाव कार्य करणाऱ्या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

News Desk