HW News Marathi
Covid-19

आनंदाची बातमी ! सिरम इन्स्टीट्यूटमधून कोरोना लशीचे कंटेनर रवाना..

पुणे | भारतातील पहिल्या कोव्हिशील्ड लसीचे डोस आज (१२ जानेवारी) पहाटे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधून पहाटे विमानतळाकडे रवाना झाले. यावेळी लसींचे डोस इतर शहरांमध्ये रवाना होण्यापूर्वी त्याची पूजा करण्यात आली. या पुजेचा मान पुणे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांना मिळाला. त्यांनी हार, फुलं वाहत कंटेनरची पूजा केली. यावर बोलताना माझ्यासाठी हा मोठा मान असल्याचं नम्रता पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे लोकांची कोरोना लसीची प्रतीक्षा अखेर संपली आहे.

कोव्हीशिल्ड लसीचे डोस काल (११ जानेवारी) पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर आज या लसीचे काही डोस देशातील प्रमुख १३ शहरांमध्ये रवाना होणार आहेत. पुणे विमानतळावरून लसीचे डोस देशभरातील १३ शहरांमध्ये पाठवण्यात येणार आहेत. यामध्ये औरंगाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकत्ता, विजयवाडा हैदराबाद, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे.

दरम्यान, सीरमच्या कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन या दोन लसींच्या आपातकालीन वापराला मंजुरी दिल्यानंतर कोव्हिशील्ड लस देशाबाहेर पाठवता येणार नसल्याचा निर्णय सरकारने घेतला होता. कोव्हिशील्ड लसीच्या निर्यातीला आता थेट मार्च किंवा एप्रिल महिन्यातच परवानगी मिळू शकते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्येत वाढ, गेल्या २४ तासांत ६९७१ नवे रुग्ण

News Desk

आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू, राज्यात एकूण ८ मृत्यू

News Desk

अखेर बुलडाण्यात संचारबंदी लागू, शाळा महाविद्यालय बंद

News Desk