मुंबई | देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या २४ तासात देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या लाखाच्या पुढे गेला आहे. २४ तासात ४ हजार ९७० नव्या रुग्णांची नोंद झाली. रुग्णांच्या संख्येसंदर्भातात एका दिवसात झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. यादरम्यान कालावधीत १३४ जणांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत देशातील कोरोना रुग्णांची संख्या १,०१,१३९ एवढी झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे ३ हजार १६३ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहितीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (१९ मे) दिली आहे.
COVID19 cases cross 1 lakh mark with a single-day jump of 4970 cases & 134 deaths; total cases 101139 & death toll 3163: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/i16FULqLjn
— ANI (@ANI) May 19, 2020
तसेच महाराष्ट्र हा कोरोना रुग्णांच्या संख्येत देशात प्रथम क्रमांकावर आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार ५८ झाली आहे. काल (१८ मे) २०३३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात काल ७४९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ८ हजार ४३७ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २५ हजार ३९२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.