नवी दिल्ली | देशातील क्रीडा क्षेत्रासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. क्रिकेटपटू रोहित शर्मा, पॅरा अॅथलेटिक्स मरिअप्पन थंगवेलू, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, कुस्तीपटू विनेश फोगाट आणि हॉकीपटू राणी यांना राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे क्रीडा मंत्रालयाच्या इतिहासात प्रथमच खेलरत्न पुरस्कारासाठी एकाच वेळी ५ क्रीडापटूंची नाव नाहीत करण्यात आली आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून शुक्रवारी (२१ ऑगस्ट) याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झालेली राणी ही पहिली महिला हॉकीपटू ठरली आहे. २०१६ साली बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, जिम्नॅस्ट दीपा करमाकर, नेमबाज जितू राय आणि महिला मल्ल साक्षी मलिक या ४ क्रीडापटूंना एकाच वेळी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यानंतर, यंदा पहिल्यांदाच खेलरत्न पुरस्कारासाठी ५ क्रीडापटूंची नावे जाहीर झाली आहे.
Cricketer Rohit Sharma, para-athlete Mariappan Thangavelu, table tennis champion Manika Batra, wrestler Vinesh Phogat & hockey player Rani to get Rajiv Gandhi Khel Ratna Award. pic.twitter.com/WwUOrGXqfT
— ANI (@ANI) August 21, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.