HW News Marathi
Covid-19

सचिन तेंडुलकरला कोरोना!

मुंबई | भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला कोरोनाची लागण झाली आहे. सचिनने स्वत: सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकर रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये खेळला होता. या स्पर्धेत सचिनच्या नेतृत्वाखाली भारतीय संंघाने अंतिम सामन्यात श्रीलंकाचा पराभव करत विजेतेपद मिळवले होते.

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी मी सर्व खबरदारी घेत होतो. या व्हायरसची काही लक्षणे जाणवल्यानंतर मी चाचणी केली. त्याच रिपोर्ट आला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. घरातील अन्य सदस्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे सचिनने पोस्टमध्ये म्हटले आहे. मी स्वत:ला घरी होम क्वारंटाइन करून घेतले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी योग्य अशी काळजी घेत आहे.

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सहभाग

सचिन तेंडुलकर नुकताच रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये खेळला. या स्पर्धेत त्याने धुवांधार बॅटिंग केली. सेहवागच्या साथीने सलामीला मैदानात येत त्याने इंडिया लिजेंड्सला स्पर्धेतील मॅच जिंकवून देण्यात मोलाची भूमिका पार पाडली. या स्पर्धेत इंडिया लिजेंड्स संघाकडून सचिनने सर्वाधिक धावा फटकावल्या. भारतीय संघाने या स्पर्धेत विजय मिळवला. भारताने श्रीलंकेला 14 धावांनी हरवून, ट्रॉफीवर नाव कोरलं होतं.

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांबाबत काल (२६ मार्च) आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार राज्यात ३६,९०२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तुलनेने राज्यातील हा आकडा फार मोठा असून शासन-प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive : अबब…एका महिन्यात कमावले साडे चार लाख रुपये !

News Desk

मुंबई, पुणे मंडळात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक

News Desk

लॉकडाऊनमुळे सांगलीत अडकलेले ४८० नागरिक तामिळनाडूत सुखरूप पोहोचले

News Desk