HW News Marathi
महाराष्ट्र

जळगावमध्ये क्रूझर आणि डंपरचा भीषण अपघात, ११ जणांचा मृत्यू

जळगाव | जळगाव जिल्ह्यात येवला तालुक्यातील हिंगोणाजवळ क्रूझर आणि डंपरच्या धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ११ जण ठार तर ७ जण जखमी झाले आहे. या अपघातातील जखमींवर यावल, भुसावळ आणि जळगावात रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

स्वागत समारंभाचा कार्यक्रम आटोपून घराकडे परतत असताना हा अपघात झाला आहे. मृतांमध्ये सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मिळत आहे. महाजन आणि चौधरी कुटुंबातील लोक रात्री बारा ते साडेबारा दरम्यान मुक्ताईनगर येथून कौटुंबिक कार्यक्रमहून घरी परतत असताना प्रवासातच क्रूझर आणि डंपरची भीषण धडक होऊन हा अपघात झाला.

मृतांची नावे

मंगलाबाई ज्ञानेश्वर चौधरी (वय ६५), प्रभाकर उर्फ बाळू नारायण चौधरी (वय ६०), प्रभाबाई प्रभाकर चौधरी (वय ४०), आश्लेषा उमेश चौधरी (वय २८), रिया जितेंद्र चौधरी (वय २१), सोनाली जितेंद्र चौधरी (वय ३४), प्रियांका नितीन चौधरी (वय २९) हे सर्व मुक्ताईनगर येथे राहणारे आहेत. तर सोनाली सचिन महाजन (वय ३४), सुमनबाई श्रीराम पाटील (वय ५५) आणि संगीता मुकेश पाटील (वय ४०) हे रावेर येथे राहणारे आहेत.

जखमींची नावे

सर्वेश नितीन चौधरी (वय ९) , शिवम प्रभाकर चौधरी, मीना प्रफुल चौधरी (वय ३०), सुनिता राजाराम पाटील, धनराज गंभीर कोळी (क्रूझर चालक) हे चिंचोल येथे राहतात. आदिती मुकेश पाटील ही निंबोल येथे राहते. तसेच डंपर चालक मुकुंदा गणेश भंगाळे हे यावल येथे राहतात.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सत्तेच्या गैरवापराबद्दल सुप्रिया सुळेंनी वडिलांना विचारावं”, भाजपची टीका!

News Desk

पक्षशिस्त मोडल्याने नाना पटोलेंनी काँग्रेस महासचिवांना निलंबित केलं!

News Desk

मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढण्याची ही वेळ नाही, संभाजीराजेंची भूमिका !

News Desk