HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

राज्यात ‘कोरोना’बाधितांची संख्या ११६ वर, सांगलीतील एकाच कुटुंबातील ५ जणांना संसर्ग

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. आज (२५ मार्च) कोरोनाग्रस्तांची संख्या  ११६ वर गेली आहे. यात सांगली जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील ९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या कुटुंबातील चौघांना आधीच कोरोना झाला होता. त्यानंतर कुटुंबातील आणखी पाच सदस्यांचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत. तर मुंबईत देखील आज (२५ मार्च) चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.

महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ११६ झाली आहे.आज सांगली येथील एकाच कुटुंबातील ५ सदस्य संसर्गातून बाधीत आढळून आले आहेत व मुंबई येथे ४ सदस्य प्रवास इतिहास अथवा संसर्गातून बाधीत झाले आहेत. यात दिलासादायक म्हणजे यापैकी १४ सदस्य बरे होऊन रुग्णालयातून सोडण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत, असे ट्वीट राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मिरजेच्या सिव्हिल रुग्णालातमध्ये कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. कोरोनाबाधित कुटुंब हे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमधील रहिवासी असल्याची माहिती आहे. नव्याने वाढ झालेल्या कोरोना बाधितांमध्ये दोन महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील नऊ जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे कोरोना संकटाच्या भीषणता राज्यातील जनतेने लक्षात घेतली पाहिजे.

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या

मुंबई – ४५
पुणे – १९
पिंपरी चिंचवड – १२
सांगली – ९
कल्याण – ५
नवी मुंबई – ५
नागपूर – ४
यवतमाळ – ४
अहमदनगर – ३
ठाणे – ३
सातारा – २
पनवेल – १
उल्हासनगर – १
वसई विरार – १
औरंगाबाद – १
रत्नागिरी – १

एकूण – ११६ कोरोनाग्रस्तांची संख्या

Related posts

पुणे बेंगलोर महामार्गावर अपघात, १७ जणांचा मृत्यू, २० जखमी

News Desk

आम्ही लोकांच्या दारापर्यंत विकासाची गंगा पोहोचविण्याचे काम करतो !

News Desk

राहुल गांधी पाकिस्तानच्या हातचे बाहुले बनले, जावडेकरांची टीका

News Desk