मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाबरोबर आता निसर्ग चक्रीवादळाचे संकट उभे राहिले आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने रेड अलर्ट जारी करण्यात आले असून मुंबईसह किनारपट्टी भागात संचारबंदी जारी केली आहे. हे वादळ आज (३ जून) अलिबागला धडकण्याची शक्यता आहे. तासागणिक निसर्ग चक्रीवादळ पुढे सरकते आहे. निसर्ग चक्रीवादळ अलिबागपासून १४० किलोमीटर अंतरावर तर मुंबईपासून १९० किलोमीटर अंतरावर, चक्रीवादळ दुपारी तीन ऐवजी एक वाजेपर्यंत धडकण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
#CycloneNisarga has become severe cyclonic storm, it is 200 kms away from Mumbai. The cyclone is moving north easterly towards Alibag in Raigad district. The severe cyclonic storm nisarga is likely cross south of Alibag between 1pm to 3pm: Shubhangi Bhute, Scientist, IMD Mumbai pic.twitter.com/hPyHSf6TBl
— ANI (@ANI) June 3, 2020
राज्याच्या किनारपट्टीवर आज निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता असल्यामुळे एनडीआरएफसह नौदलाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निसर्ग चक्रीवादळ भीषण स्वरुप धारण करण्याची दाट शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत काल (२ जून) फोनवरून संवाद साधला आहे.
निसर्ग चक्रीवादळ रायगडसह मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत मोठे नुकसान करण्याची शक्यता आहे. त्याशिवाय उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागही या वादळाच्या पट्ट्यात येईल, असा अंदाज आहे. गुजरातमधील वलसाड, नवसारी, डांग, सुरत तसेच दमण, दादरा नगर हवेली भागालाही निसर्गचा फटका बसू शकतो. या संपूर्ण भागांसाठी रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.