HW News Marathi
महाराष्ट्र

दानवे म्हणाले- “मुख्यमंत्री महोदय पाठीशी उभे रहा, पुढचं मी बघतो”

औरंगाबाद | “रावसाहेब दानवेंना शब्द देतो, तुम्ही मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी पुढाकार घ्या, आम्ही खंबीर पाठीशी राहतो” असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं. मुख्यमंत्री महोदय पाठीशी उभे रहा, पुढचं मी बघतो, असं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले होते. “मराठवाड्यात आपण आपआपसात भांडत कशाला बसायचं? नालायकपणे कारभार करुन आपणही भांडत राहिलो तर फरक काय राहिला. अपेक्षेशिवाय आयुष्य असू शकत नाही, तुम्ही आमच्याकडे आणि आम्ही तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करायच्या” असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

आज सुद्धा पैसे द्यायला तुमच्यावर विश्वास ठेवतात की नाही माहीत नाही

माझ्या राज्याच्या राजधानी आणि उपराजधानीला जोडणारा लोहमार्ग मुंबई नागपूर बुलेट ट्रेन होणार असेल, तर मी तुमच्या सोबत आहे. रावसाहेब तुम्ही प्रेझेंटेशन दिलं नाही तरी चालेल, आम्ही पाठीशी उभे राहू, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला. रावसाहेब बऱ्याच दिवसांनी एकत्र आलेत, जुने सहकारी आहेत, गंमत-जंमत हवीच, असं म्हणत “आज सुद्धा पैसे द्यायला तुमच्यावर विश्वास ठेवतात की नाही माहीत नाही“ असा रावसाहेब दानवे यांना टोला लगावला.88 साली सभा औरंगाबादेत झाली तेव्हा मी सभेच्या मागे गच्चीवर पाहत होतो, पण तेव्हा मला माहित नव्हते की मी पण मुख्यमंत्री होऊन कार्यक्रमाला येईन, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मला रेल्वे का आवडते कारण तिला रूळ असतात, रूळ सोडून इंजिन कुठेही जात नाही. 45 वर्षात दुसऱ्यांदा उद्घाटन झालं, पण आता तसं होणार नाही, अब्दुल जी आणखी 20 कोटी मिळतील पण मला त्याचा हिशोब हवाय, जे करायचं ते सरळ करीन, मला इकडे ही इमारत उभे राहिलेले पाहिजे म्हणजे पाहिजेच, दया माया चालणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी खडसावून सांगितलं.जे काही गरजेचं आहे ते केल्याशिवाय मी राहणार नाही. क्लायमेट चेंज झालंय हे दुर्भाग्य आहे आपलं. अतिवृष्टी सुद्धा अशी होतेय की काही दिवसांचा पाऊस काही तासात पडतोय. जिल्हा परिषद हे जनतेची सेवा करणारं मंदिर आहे. याचं पावित्र्य जपलं पाहिजे. मराठवाड्यात संतपीठ पाहिजेच, मराठवाडा संतांची भूमी आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तिवरे धरण : ११ जणांचा मृत्यू, तर १३ जण बेपत्ता

News Desk

मोदीसाहेब शेतकऱ्यांसोबत युध्द लढणार आहे का? – नवाब मलिक

News Desk

जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होऊ नये यासाठी सहकार्य करा, डॉ. राजेंद्र शिंगणेंचे आवाहन

News Desk