HW News Marathi
महाराष्ट्र

सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी झाली पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांची सून!

जळगाव। एकीकडे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते असलेले संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. तर इकडे खान्देशातील जळगावात देखील एका मंत्र्यांच्या मुलाच्या लग्नाची चर्चा तितकीच सुरू आहे. अर्थातच राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरी लहान मुलाच्या लग्नाची लगीनघाई सुरू आहे. तर संजय राऊत यांच्या कन्या पूर्वशीची जशी चर्चा आहे, तशी जळगावातल्या सुनबाई प्रेरणाच्या निखळ सौंदर्याची देखील तितकीच चर्चा सुरू आहे. गुलाबराव पाटील यांचे कनिष्ठ पुत्र विक्रम पाटील यांचा आज विवाह सोहळा संपन्न होतोय. चोपडा तालुक्यातील शेतकरी सनपुले भगवान भिका पाटील यांची सुकन्या प्रेरणा हिच्यासोबत विक्रम पाटील विवाह बंधनात अडकले जाणार आहेत.

गुलाबराव पाटील यांची सुनबाई आहे तरी कोण?

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरी सून म्हणून जाणारी ही कन्या अत्यंत साध्या आणि शेतकरी कुटुंबातील आहे. प्रेरणा पाटील हिने बीएससी कंप्यूटरचे शिक्षण घेतले आहे. गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव विक्रम हे बीई (मेकॅनिकल) आहेत. विक्रम हे व्यावसायिक आहेत. प्रेरणाचे वडील म्हणजेच गुलाबराव पाटील यांचे होणारे व्याही सनपुले भगवान भिका पाटील हे यात्रा केबल्स कंपनीत लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून कामाला आहेत. घरची शेती सुद्धा तेच सांभाळतात. मंत्र्यांचा मुलगा आणि शेतकरी कुटुंबातील लेक असा हा विवाह सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी विविध मंत्र्यांची उपस्थिती राहणार आहे. आज सोमवारी सायंकाळी सात वाजता हे लग्न पार पडणार आहे या लग्नाला महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांची उपस्थिती असणार आहे.

या मंत्र्यांची असेल उपस्थिती?

चोपडा तालुक्यातील साईबाबा मंदिरात हा लग्नसमारंभ आयोजित करण्यात आला आहे. लग्नसोहळा साधा असला तरीही या सोहळ्यात महा विकास आघाडीतील 14 मंत्री उपस्थित राहणार आहेत. यात छगन भुजबळ, जयंत पाटील,अब्दुल सत्तार, उदय सावंत,नवाब मलिक,

बाळासाहेब थोरात, सुनील केदार, आदिती तटकरे, संदिपान भुमरे, जितेंद्र आव्हाड, संजय बनसोडे आदी मान्यवरांची या सोहळ्यासाठी खान्देशात हजेरी लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊतांनंतर सुप्रिया सुळेंचे मुलाखत कुणाल कामरा घेणार?

News Desk

वेळप्रसंगी कर्ज काढू पण शेतकऱ्यांना मदत करू, शेताच्या बांधावर जाऊन विजय वडेट्टीवार यांनी दिला शेतकऱ्यांना दिलासा

News Desk

एसटी कर्मचार्‍यांच्या प्रश्नावरून फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk