HW News Marathi
देश / विदेश

भारतात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना DCGIची मंजुरी

नवी मुंबई । संपूर्ण जग वर्षभर कोरोनासारख्या महामारीच्या विळख्यात होते. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाच्या लशीबाबत सकारात्मक वृत्त येत असल्याने आपण लवकरच या विळख्यातून आता बाहेर पडण्याची आशा सर्वानाच आहे. मात्र, आता कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा देखील धोका आहेच. या स्थितीत कोरोनाचा फैलाव नियंत्रणात राहावा यासाठी आता DCGIकडून भारतात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींच्या आपात्कालीन वापराची संमती आता देण्यात आली आहे. DCGIने आज (३ जानेवारी) थोड्याच वेळापूर्वी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.

देशात लसीकरण मोहिमेची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे. ७१९ जिल्ह्यांतील ५७ हजार स्वयेंसेवकांसह लसीकरण करणाऱ्या ९६ हजार कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण झाल्याचे यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे. यासह, सरकारच्या कोविन ऍपवर यासाठीचे रजिस्ट्रेशन आणि व्हेरीफिकेशन सुरू असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, DCGI कडून भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळालेल्या या लशी २ ते ८ डिग्री सेल्सिअसमध्ये स्टोर कराव्या लागणार असल्याची देखील माहिती देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या काय आहे कलम ४९७

News Desk

राकेश अस्थाना यांची चौकशी सुरूच राहणार, दिल्ली उच्च न्यायालयाचा दणका

News Desk

देशात महागाई स्थिर, सर्वत्र परिवर्तन सुरू | मोदी

swarit