HW Marathi
महाराष्ट्र मुंबई

भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर पोहोचला 

भिवंडी | भिवंडी शहरातील पटेल कंपाउंड परिसरातील ३ मजली बेकायदा इमारत काल (२१ सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास कोसळली. या दुर्घेटनेतील मृत्यूची संख्या आता २० वर पोहोचली आहे. त्यात ७ मुलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत २५ जण जखमी झाले आहेत. अत्यंत दाटीवाटीच्या क्षेत्रात असलेली इमारत आणि ढिगाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी अरुंद रस्ता यांमुळे मदत पथक वेळेवर पोहोचूनही प्रत्यक्षात बचावकार्य सुरू होण्यात बऱ्याच अडचणी आल्या होत्या.

 

इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना राज्य सरकारकडून ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. जखमींना महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे जाऊन शिंदे यांनी जखमींची विचारपूस केली. या दुर्घटनेची चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. भिवंडी महापालिकेने शहरातील १०२ धोकादायक इमारती रिकाम्या केल्या असून, अशा प्रकारच्या इमारतींचा आढावा सातत्याने प्रशासनाकडून घेतला जातो, असेही त्यांनी सांगितले.

Related posts

मांजर फेकल्याच्या जाब विचारला म्हणून महिलेचा खून

News Desk

ऑगस्टमध्ये सुट्यांचा हंगाम

News Desk

अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणाऱ्या दुकाने आणि आस्थापनांना निर्बंधातून सूट

rasika shinde