HW News Marathi
महाराष्ट्र

अॅपे रिक्षातून पडून विद्यार्थ्यीनीचा मृत्यू

सिरसाळा प्रतिनिधी : गोवर्धन येथून सिरसाळा येथे अॅपे रिक्षा व्दारे शाळेला जात असलेल्या विद्यार्थ्यीनी रुपाली बाबुराव साळवे ( १४ ) रा. गोवर्धन हीचा चालत्या अॅटोतून खाली पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली आहे. हा प्रकार अॅपे अॅटो चालकाच्या निष्काळीपणे घडला आहे. याविषयी सविस्तर वृत्त असे कि, एसटी बसची सुवीधा नसल्याने गोवर्धन येथील विद्यार्थी खाजगी वाहणचा आधार घेतात. गुरुवारी सकाळी सिरसाळा येथे न्यू हायस्कूल शाळेला जाण्यासाठी गोवर्धन येथून अॅपे अॅटो क्रमांक एम एच २३ एच ९२२२ ह्या व्दारे शालेय विद्यार्थी प्रवास करत होते. अॅटो चालकने अॅटो खचा खच खाली वरी भरला होता. यात रुपाली बाबुराव साळवे ही विद्यार्थ्यांनी एका बाजूस बसली होती.

अॅटो चालक अॅटो भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवत होता. सिरसाळा- गोवर्धन रोडवरील जय सेवालाल तांडा समोरिल रस्त्यावर रुपाली अॅपे मधून खाली पडली. तीच्या हाता पायाला डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. यावेळी ती बेशुद्ध पडली .हा प्रकार घरच्यांना कळताच घरचे तेथे आले व रुपालिस अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात नेले, डाॅक्टरांनी तपासुन रुपालिला मयत घोषित केले. रुपाली हि सिरसाळा येथील न्यू हायस्कूल येथे इयत्ता ८ वी वर्गात शिकत होती. मयत रुपालीचा भाऊ नितीन बाबूराव साळवे ह्याच्या फिर्यादी वरुन सिरसाळा पोलिस स्टेशन येथे अॅटो एम एच २३ एच ९२२२ विरुद्ध कलम ३०४ अ २७९ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत रुपाली चे शवविच्छेदन अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आले तर अंत्यसंस्कार गोवर्धन येथे करण्यात आले. ह्या घटने बद्दल गोवर्धन, सिरसाळा परिसरात नागरिक, विद्यार्थी हळहळ व्यक्त करत आहेत.

सिरसाळा येथे शिक्षणासाठी परिसरातील गोवर्धन, हिवरा, हसनाबाद, पिंपरी, आचार्य टाकळी, रेवली, वाका, वांगी येथील विद्यार्थी दरोज येतात. एसटी बस नसल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव ह्या खाजगी वाहतूकीचा आधार घ्यावा लागतो आहे. अॅटो चालक आपला अॅटो वर खाली खचा खच भरुन नेतात. ह्यात विद्यार्थी जिव मुठीत धरुन प्रवास करता.याच मुळे आज सावित्रीच्या एका लेकीला आपला प्राण गमवावा लागला आहे. एस टी परळी डेपोने या ठिकाणी बस सुरु करणे गरजेचे आहे.

अवैध वाहतूक वाढली : सिरसाळा व परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक केली जाते आहे. अॅपे अॅटो, जीप ह्या व्दारे अवैध वाहतूक केली जाते. वाहन चालक आपली वाहने खचा खच खाली वरी भरुन वाहतूक करतात यामुळे नागरिकांच्या जिवीतास धोका वाढला आहे.

दहा वर्षात सावित्रीच्या दोन लेकींना प्राण गमवावा लागला अहे नऊ वर्षा पूर्वी कान्नापुर, मोहा येथून सिरसाळा येथे शाळे साठी येत असलेल्या विद्यार्थ्यांनीचा अपघाता दरम्यान मृत्यू झाला तर काल गुरुवारी गोवर्धन च्या विद्यार्थ्यीनीला आपला प्राण गमवावा लागला आहे. हेवढे झाले तरी एस टी परळी डेपोला जाग यईना कारण ह्या विद्यार्थीनी अवैध वाहतूकीचा बळी ठरल्या आहेत. जर डेपोची बस सुवीधा असती तर ह्याना आपला प्राण गमवावा लागला नसता

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांकडे मुख्यमंत्री पदाचा कार्यभार द्यावा! – रामदास आठवले

Aprna

तब्लिगीच्या उरलेल्या ५० जणांनी स्वत:हून पुढे या, अन्यथा कारवाई करु

News Desk

‘सब घोडे बारा टके’च आहेत, अशा घोड्यांवर शर्यती जिंकता येत नाहीत!’, सेनेनं सिंग प्रकरणावरुन भाजपला सुनावले  

News Desk