HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनाही धमकीचा फोन!

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान उडवून देण्याच्या धमकी काल (६ सप्टेंबर) देणारा फोन आला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील आणखी काही महत्वाच्या नेत्यांना धमकीचा फोन आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमकीचा फोन आला आहे. तसेच, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचा फोन आला आहे.

राज्यात आघाडी सरकारवर एकामागून एक संकट येताना दिसत आहेच. दरम्यान. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज शरद पवारांची वाय बी चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. तसेच, त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशीही बातचीत केली. नेमकी त्यांच्यात काय चर्चा झाली याचे कारण अद्याप समजले नाही आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दुबईहून धमकीचा फोन आला होता तर शरद पवार यांना परदेशातून आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सांगलीत १४ वर्षीय मुलाला मगरीने पाण्यात ओढले

News Desk

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन

News Desk

आरबीआयच्या नव्या धोरणाला शरद पवारांचा विरोध!

News Desk