HW News Marathi
महाराष्ट्र

Dongri Building Collapsed : मृतांचा आकडा १४ वर, बचावकार्य सुरूच

मुंबई | दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरात केसरबाई नावाची चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला, तर ९ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सात पुरुष, चार महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे. तर सर्व जखमींना उपचारांसाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफ, मुंबई अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे.

डोंगरी येथील केसरबाई इमारत मंगळवारी (१६ जुलै) सकाळी साडेअकराच्या सुमारास कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटना घडल्यानंतर कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे पन्नास जण अडकल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.ही इमारत जुनी असून म्हाडाची असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. महापालिकेने काही दिवसांपूर्वीच धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली होती. परंतु या यादीत या इमारतीचा समावेश नाही. त्यामुळे ही इमारत नेमकी कशी कोसळली हे अद्याप समजू शकलेले नाही.

म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतीत याचा समावेश नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर इमारतीच्या पुनर्विकासासाठी विकासकाची नियुक्ती केली होती. विकासकाने काम वेळत केलं की नाही याची चौकशी केली जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयाला सुप्रिया सुळेंचा विरोध

News Desk

राज्यपालांचं पुस्तक पुरात वाहून गेलं का पाहावं लागेल; राऊतांचा खोचक टोला

News Desk

परशुराम घाट पुन्हा बंद होणार; ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Chetan Kirdat