HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र

पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसकर झाले होम क्वारंटाईन

पुणे | पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. आमदार, महापौर यांच्या पाठोपाठ आता पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दीपक म्हैसेकर स्वत: होम क्वारंटाईन झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या ड्रायव्हरने कोरोना चाचणी केली होती. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर दीपक म्हैसेकर यांनी खबरदारी म्हणून घरीच विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्यात विभागीय आयुक्तांच्या नियंत्रणात कोरोना रोखण्याबाबत रणनिती आखली जात आहे. कोरोना नियंत्रणाच्या सर्व बैठका दीपक म्हैसेकर यांच्या उपस्थितीत पार पडत आहेत.

Related posts

पुण्यातील काही भाग पुर्णपेणे सील करण्याचा महापालिकेचा निर्णय

News Desk

जसं राम मंदिर बांधून कोरोना जाणार नाही तसं पावसात भिजूनही पंतप्रधान होणार नाही – अवधूत वाघ

News Desk

राज्याचे विधिमंडळ पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले, ‘ही’ आहे नवी तारीख 

News Desk