HW News Marathi
देश / विदेश

दीपिका कुमारी क्वार्टर फायनलमध्ये दाखल!

टोक्यो । टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारत कमालीची कामगिरी करत असताना अजून एक यश भारताच्या पदरी आलं आहे.जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असणाऱ्या दिपिका कुमारीने जबरदस्त कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक दिली आहे. दीपिका कुमारीने रशियाच्या सेनिया पेरोवाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. दिपिकाने हा सामना ६-५ ने जिंकला आहे. भारताला तिरंदाजीत दिपिका कुमारीकडून पदकाची अपेक्षा आहे. दिपिका कुमारीला आज उपांत्य फेरीचा सामना खेळावा लागणार आहे. दिपिका कुमारीसोबत अतून दासनेही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

मनू भाकर कडून निराशा

25 मीटर एअर पिस्टल स्पर्धेची पात्रता फेरी संपताच मनु भाकरचा ऑलिम्पिक प्रवासही पूर्ण झाला. मनुने तीन स्पर्धांमध्ये भाग घेतला होता आणि तिला कोणत्याही प्रकारात अंतिम फेरी गाठता आली नाही. सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पिस्टल नेमबाजीत भारताला रिकाम्या हाताने परतावं लागलं आहे.शूटिंगमध्ये दीपिकाने हा रोमांचक सामना 6-5 ने जिंकला. ROC च्या पारोव्हाने 07 गुण मिळवताना दीपिकाने परिपूर्ण 10 लावत सामना जिंकला आणि उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.

पी.व्ही.सिंधू उपांत्यपूर्व फेरीत दाखल

भारताची सर्वतोकृष्ट बॅडमिंटनपट्टू पी. व्ही. सिंधू आता टोक्यो ऑलिम्पिक्समध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या सिंधूने डेनमार्कच्या मिया ब्लिचफेल्डचा दोन सरळ सेटमध्ये पराभव करत उपांत्यपूर्वी फेरीत आपला प्रवेश निश्चित केला. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावरील सिंधूने उपउपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या क्रमवारीत १२ व्या स्थानावरील मिया ब्लिकफेल्डचा ४० मिनिटांमध्ये २१-१५, २१-१३ अशा फरकाने पराभव केला. त्यामुळे आता सिंधू पदकापासून केवळ दोन विजय दूर आहे. या विजयामुळे सिंधूची मियाविरुद्धची आतापर्यंतच्या सामन्यांमधील सिंधूची कामगिरी ५-१ अशी झालीय. म्हणजेच या दोघींमध्ये झालेल्या सहा सामन्यांपैकी पाच सामने सिंधूने जिंकलेत. उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जागतिक वडापाव दिन

swarit

हृदय हेलावणारी गोष्ट

swarit

मोदींचे आंदोलक शेतकऱ्यांना चर्चेचे निमंत्रण

News Desk