नवी दिल्ली | कोकणात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने अनेक नागरिक पुरात अडकले आहेत. चिपळूणमधे मदतकार्य पोहोचलं असून बचाव कार्याला सुरुवात झाली आहे. राज्यातील आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतकार्यासाठी सैन्यदलाची मदत उपलब्ध करुन देण्यात येईल असे आश्वासन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलं आहे.
संरक्षण मंत्र्यांकडून आश्वासन
उपमुख्यमंत्री अजित पावर यांनी राजनाथ सिंग यांच्या कडे सैन्यदलाची मदत उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. पूरपरिस्थिती लक्षात घेता राजनाथ सिंग यांनी सैन्यदलाची मदत उपलब्ध करण्याचं आश्वासन दिलं आहे. अतिवृष्टीग्रस्त भागातील बचाव व मदतकार्यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाशी समन्वय ठेवण्यासाठी राज्यसरकारने मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्यावर नोडल ऑफिसर म्हणून जबाबदारी सोपवली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळून निर्माण झालेल्या आपत्कालिन परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन त्यांना सद्यस्थितीची माहिती दिली. राज्यात अतिवृष्टी व दरड कोसळलेल्या भागात सैन्यदलांची मदत तात्काळ उपलब्ध करण्यात आली असून सैन्यदलांची अधिकची मदतही उपलब्ध करण्याचे आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे.
अतिवृष्टीग्रस्त भागातील बचाव व मदतकार्यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाशी समन्वय ठेवण्यासाठी राज्यसरकारने मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्यावर नोडल ऑफिसर म्हणून जबाबदारी सोपवली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे स्वत: बचाव व मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने अतिवृष्टीग्रस्त भागातील मदत व बचावकार्याचा आढावा घेत असून आवश्यक निर्देश तातडीने दिले जात असल्याची माहीती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
सुप्रिया सुळे यांचीही संरक्षण मंत्र्यांकडे मागणी
कोकणावर ओढवलेल्या या भीषण परिस्थितीत लोकांना मदत वेळीच मिळावी म्हणून नेव्ही रेस्क्यू फोर्स चिपळुणात पाठवण्यात येण्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. त्यांनी ही माहिती त्यांच्या ट्विटर द्वारे शेअर केली आहे. ‘महाराष्ट्रात जोरदार पावसामुळे कोकण किनारपट्टी,पश्चिम महाराष्ट्र व इतर भागात पूरस्थिती आहे.येथे मदत पोहोचविण्यासाठी ‘नेव्ही रेस्क्यू फोर्स’ ची आवश्यकता आहे.यासंदर्भात शिवसेनेचे राज्यसभा खासदार श्री अनिलजी देसाई यांच्यासोबत केंद्रीय संरक्षण मंत्री मा.राजनाथ सिंह जी यांची भेट घेतली’, अशी माहिती त्यांच्या ट्विटर द्वारे मिळाली आहे.
Parts of Konkan and Western Maharashtra are flooded due to heavy rainfalls and thus there is a need for Navy Rescue Force to be sent. Met Union Defence Minister Hon. Rajnath Singh Ji today along with @ShivSena Rajya Sabha MP Hon. Anil Desai (@ianildesai) Ji in this regard. https://t.co/8nkioNT1kP
— Supriya Sule (@supriya_sule) July 23, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.