HW News Marathi
देश / विदेश

राजधानीत पावसाचं धूशान!

नवी दिल्ली | देशाची राजधानी नवी दिल्ली मध्ये पावसाने हाहाकार माजावला आहे. कमी वेळात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे दिल्लीतील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. एवढंच नव्हे तर, मुसळधार पावसामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या काही भागांत पुरस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी चार डोमेस्टीक आणि एक आंतरराष्ट्रीय विमानाचा मार्ग बदलण्यात आला आहे.

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल क्रमांक 3 वर सर्वाधिक पाणी साचलं आहे. या घटनेनंतर विमानतळ प्रशासनाकडून दिलगीरी व्यक्त करण्यात आली आहे. तसेच विमानतळाच्या धावपट्टीवरील पाणी काढून टाकण्यासाठी कर्मचाऱ्यांची एक टीम त्याठिकाणी पोहोचली असून धावपट्टीवरील पाणी काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच दिल्लीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 4 राष्ट्रीय आणि 1 आंतरराष्ट्रीय विमानाचे मार्ग बदलण्यात आले आहे. संबंधित विमानं जयपूर आणि अहमदाबाद विमानतळाकडे वळवण्यात आल्याची माहितीही विमानतळ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

शिवाय राजधानी दिल्लीत जागोजागी पाणी साचल्यानं अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, आज दिवसभर ढगाळ हवामानासह मुसळधार पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे. आज दिल्लीला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत असल्यानं दिल्लीतील तापमानात घट झाली आहे. दिल्लीतील तापमान सरासरी तापमानापेक्षा 3 ते 4 अंशांनी खाली पोहोचलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारताने सुवर्णपदक विजेत्या अर्जेंटिनाला धूळ चारली, उपांत्यपूर्व फेरीत स्थान झाले निश्चित

News Desk

भारतात रोजगार उपलब्ध करून देण्यास आम्ही मदत करू शकतो | चीन

News Desk

ISRO अंतराळात १९ सॅटेलाईट लॉन्च करणार, आज २०२१ मधील पहिलं अंतराळ अभियान

News Desk